भारतामध्ये जवळपास प्रत्येक जण चहा पितो आणि म्हणूनच मार्केटमध्ये चहाला प्रचंड मागणी असते.
तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. चहा बरोबरच मसाला दूध देखील तुम्ही विकू शकता.
एखाद्या चांगल्या वर्दळीच्या भागात तुम्ही तुमचा चहाचा स्टॉल लावू शकता आणि हे काम सुरू करू शकता.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या बिजनेस मध्ये तुम्हाला फक्त चहा बनवायचा आहे आणि त्याची विक्री करायची आहे.
👉 मार्केट रिसर्च करा
तुमच्या भागातील काही चांगली वर्दळीच्या ठिकाणे शोधून काढा.
इतर लोक चहा विकण्यासाठी कोण कोणत्या पद्धतींचा आणि आयडिया चा वापर करत आहेत त्याचं निरीक्षण करा.
तुमच्या भागातील इतर यशस्वी चहा व्यावसायिकांचा अभ्यास करा.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- चहा बनवण्यासाठी आवश्यक असलेले सामान आणि भांडे
- गॅस किंवा शेगडी
- टेबल छत्री आणि काही खुर्च्या
- पाणी तसेच काही ग्लास
- एखाद पोस्टर किंवा बॅनर
👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
पाच ते दहा हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.
👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?
- स्टॉल साठी एक चांगलं लोकेशन निवडा. एक चांगलं वर्दळीचे ठिकाण निवडा.
- अधून मधून लोकांना फ्री मध्ये चहा पाजा ज्याने नवीन कस्टमर आकर्षित होतील.
- चहाची टेस्ट आणि क्वालिटी खूपच महत्त्वाची आहे.
- स्टॉल च्या समोर एखादा डुबलीकेट मोठा चहाचा ग्लास किंवा असं काही आकर्षक दृश्य तयार करा ज्याने लोकांचं त्याकडे लक्ष जाईल.
- मार्केटिंग करण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम चा वापर करू शकता.
- बिजनेस मध्ये नावीन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही भारतीय आयुर्वेदिक आणि हेल्दी चहा बनवू शकता. ज्यात तुम्ही चहापावडर ऐवजी इतर गोष्टींचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला या गोष्टीचा थोडा अभ्यास करावा लागेल.
👉 व्यवसायातून किती नफा होईल ?
महिन्याला 20 हजार ते 60 हजार रुपये पर्यंत कमाई या व्यवसायातून तुम्ही करू शकता.
कमाई वाढण्यासाठी तुम्ही चहा सोबत नाश्ता देखील लोकांना देऊ शकता.
जर तुमचा व्यवसाय चांगला चालायला लागला आणि जर तुम्ही फ्रॅंचाईजी वगैरे दिल्या तर तुम्ही करोडो देखील कमवू शकता.
👉 व्यवसायातील आव्हाने
आजकाल अनेक लोक अशा प्रकारचे व्यवसाय करत आहे त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. तुम्हाला काहीतरी वेगळेपण दाखवावं लागेल.
👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- इतर यशस्वी व्यवसायिकांचं निरीक्षण करा आणि ते असं काय वेगळं करत आहे ते बघा.
- वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग आणि जाहिरात करून बघा.