प्रत्येक घरामध्ये बेडशीट, चादर, तसेच ब्लॅंकेट चा वापर केला जातो.
अस एकही घर तुम्हाला सापडणार नाही ज्या घरात या गोष्टींची गरज नसते.
तुम्ही एखाद्या होलसेलर कडून स्वस्तामध्ये या गोष्टी विकत घेऊ शकता आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकतात.
हे प्रॉडक्ट तुम्ही शहरांबरोबरच खेडेगावांमध्ये देखील विकू शकता.
अतिशय कमी गुंतवणुकीत तुम्ही याची सुरुवात करू शकता.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या व्यवसायात तुम्हाला होलसेलने हे प्रॉडक्ट विकत घ्यायचे आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्यांची विक्री करायची आहे.
👉 मार्केट रिसर्च करा
आमच्या भागातील लोक कशा प्रकारचे बेडशीट, चादर किंवा ब्लॅंकेट वापरतात ते शोधून काढा.
आसपासच्या दुकानात जाऊन निरीक्षण करा.
👉 होलसेल ने प्रॉडक्ट कुठून घ्यायचे ?
- Google वर तुम्हाला अनेक होलसेल सप्लायर किंवा Manufacturer सापडतील.
- Indiamart.com या वेबसाईटवर देखील तुम्हाला अनेक सप्लायर सापडतील.
- मोठ्या शहरांमध्ये देखील याचे अनेक सप्लायर असतात.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- बेडशीट, चादर किंवा ब्लँकेट
- एखादी टू व्हीलर किंवा सायकल ( Optional )
- एखादा भोंगा किंवा स्पीकर
👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
5 ते 10 हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.
👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करायची ?
- वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकता.
- वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता जसे की एकावर एक बेडशीट फ्री.
- स्वस्त दरात विक्री करू शकता ज्याने नवीन कस्टमर आकर्षित होतील.
- भोंगा किंवा स्पीकर चा वापर करून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता.
👉 व्यवसायातून किती नफा होईल ?
25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत महिन्याला कमावू शकता.
👉 व्यवसायातील आव्हाने
- वेगवेगळ्या भागांमध्ये फिरावं लागेल
- सुरुवातीला लगेच कस्टमर मिळणार नाही
👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- बेडशीट च्या आणि इतर प्रॉडक्टच्या डिझाईन आणि कलर आकर्षक निवडा.
- विकत घेतलेले प्रॉडक्ट किंमत कमी जास्त करून विकण्यावर भर द्या.