भारतामध्ये, अनेक लोक Affiliate Marketing च्या माध्यमातून महिन्याला करोडो रुपये देखील कमावत आहे.
जर तुमचा Blog, YouTube चॅनेल, किंवा Social Media असेल तर त्यावर तुम्ही हे असे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता
त्याचबरोबर जर तुम्ही Facebook किंवा Instagram अशा Platform वर Active असाल तर तुम्ही तिथे देखील अशा Affiliate Links share करून Affiliate Marketing करू शकता आणि लाखो रुपये कमाऊ शकता.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
Affiliate Marketing म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स किंवा सर्विसेस प्रमोट करून त्यांच्याकडून कमिशन मिळवणे.
यामध्ये तुम्हाला एक Special Affiliate link मिळते आणि ज्यावेळेस कोणताही व्यक्ती या Link वर Click करून काही काही खरेदी करतो तेव्हा तुम्हाला त्याच Commission मिळत.
For Example : तुमच्या Affiliate link वर click करून एखाद्याने 2000 रुपयाचा product विकत घेतला आणि जर Affiliate Commission 15% असेल तर तुम्हाला 300 रुपये कमिशन मिळेल.
👉 मार्केट रिसर्च करा
Affiliate Marketing मध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स चांगले चालतात ते शोधून काढा.
Amazon, Flipkart, Bluehost, Hostgator, hostinger सारख्या मोठ्या कंपन्यांचे Affiliate प्रोग्राम्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही नोंदणी करू शकता. याशिवाय, कोणत्या प्रोडक्ट ला कमी स्पर्धा आहे, त्यावर लक्ष द्या.
👉 Affiliate Marketing सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- तुमची स्वतःची एक वेबसाइट किंवा ब्लॉग
- YouTube चॅनल
- सोशल मीडिया अकाऊंट्स
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन
👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?
Affiliate Marketing अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता.
ब्लॉग किंवा वेबसाईट बनवण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग मध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल,
साधारणपणे ५ ते १० हजार रुपयांमध्ये हे काम सुरु करू शकता.
👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?
- ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे प्रमोशन: प्रॉडक्ट चे Review , Comparison किंवा त्याच्या उपयोगाबद्दलचे Article लिहा आणि त्यामध्ये Affiliate लिंक द्या.
- सोशल मीडियाचा वापर करा: फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट प्रमोट करा. यूट्यूब व्हिडिओमध्ये प्रोडक्ट्सचे Demo किंवा Review टाकून लिंक शेअर करा.
- ईमेल मार्केटिंग: तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्विसेसची माहिती देणारे मेल्स पाठवा आणि त्यामध्ये तुमची Affiliate लिंक द्या.
- SEO (Search Engine Optimization): तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर असलेल्या कंटेंट SEO करून सर्च इंजिनवर रँक करून कस्टमर आकर्षित करू शकता.
👉 या व्यवसायातून किती नफा होईल ?
Affiliate Marketing मधून होणारी कमाई तुमच्या प्रमोशनवर अवलंबून आहे. तुम्ही जर चांगलं प्रमोशन करू शकलात तर महिन्याला १० हजार पासून लाखों पर्यंत कमाई करू शकता.
👉 या व्यवसायातील आव्हाने
- यशस्वी Affiliate मार्केटर बनण्यासाठी तुम्हाला सातत्याने चांगला कंटेंट ( Article, Video or Post ) बनवावा लागेल.
- स्पर्धा खूप जास्त असल्यामुळे, तुमचा कंटेंट वेगळा आणि आकर्षक असावा लागतो.
- लोकांना तुमच्या लिंकवरूनच खरेदी करण्यासाठी आकर्षित करणं हे खूप महत्त्वाचे आहे.
👉 या बिझनेस साठी काही महत्वाच्या टिप्स
- कमी स्पर्धेतील प्रोडक्ट्स निवडा, ज्यामुळे तुम्हाला विक्री करण्यास सोपं जाईल.
- तुमचा टॉपिक आणि टार्गेट ऑडियन्स ठरवा, त्या नुसार प्रोडक्ट प्रमोशन करा.
- सुरुवातीला एकच Affiliate प्रोग्राम जॉइन करा आणि त्यात स्पेशलाइज करा, नंतर इतर प्रोग्राम्समध्ये सहभाग घ्या.