लोकं आवडीने खातात हा पदार्थ, विका आणि कमवा ३०,००० महिना 

जर तुमच्या भागात लोकांना ढोकळा आवडत असेल तर तुम्ही एक ढोकळा केंद्र सुरु करू शकता. 

नॉर्मली सगळेच पदार्थ बनवून विकण्यापेक्षा जर फक्त एका प्रसिद्ध पदार्थावर फोकस केला तर खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळू शकतो. 

अतिशय कमी गुंतवणुकीत तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला हा पदार्थ चांगल्या पद्धतीने बनवता आला पाहिजे. यात तुम्ही तुमच्या घरातील महिलांची देखील मदत घेऊ शकता.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या व्यवसायात तुम्हाला एक स्टॉल लावून ढोकळा विकायचा आहे. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या हात गाड्या किंवा स्टॉल तुम्ही बघितले असतील अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. 

तुम्ही सायकलच्या किंवा गाडीच्या माग एखादा सेटअप बनवून घेऊ शकता आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकता.

👉 मार्केट रिसर्च करा 

तुमच्या भागातील काही चांगली आणि वरदळीची ठिकाण शोधून काढा. 

जर तुमच्या शहरात किंवा आसपासच्या शहरांमध्ये असे एखादा ढोकळा केंद्र कोणी चालवत असेल तर एकदा त्याला भेट द्या आणि तिथे कसं काम चालतं याचं निरीक्षण करा. 

पदार्थाची चौकशी आहे त्याचबरोबर त्यासोबत कोणत्या प्रकारची चटणी किंवा अजून काय दिला जातं ते बघा.

👉 हे काम कसं शिकायचं ?

युट्युब वर याचे अनेक व्हिडिओ आहे ते बघून शिकू शकत. घरातील महिलांची मदत घेऊ शकता. 

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • ढोकळा बनवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य 
  • एखादा टेबल, दोन खुर्च्या आणि छत्री 
  • एखादं आकर्षक बॅनर 
  • प्लेट ( पेपर प्लेट किंवा regular घरातील प्लेट )
  • पाणी तसेच पाणी पिण्यासाठी ग्लास

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

५ ते १० हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.

👉 कस्टमर कसे मिळतील ?

तुमच्या स्टॉलच्या ठिकाण खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे एखाद्या वर्दळीच्या ठिकाणाची निवड करा. 

👉 मार्केटिंग  कशी करता येईल ?

  • तुमच्या स्टॉल चे बॅनर हे आकर्षक बनवा. त्यावरून एकदम स्पष्ट हे समजलं पाहिजे की तुम्ही काय विकत आहे आणि किती किमतीला वेगळा आहे.
  • सुरुवातीला कमी किमतीमध्ये ढोकळा विकू शकता. 
  • अजून मधून फ्री मध्ये लोकांना खाऊ घाला ज्यामुळे नवीन कस्टमर आकर्षित होतील. 
  • वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टी चटण्या त्यासोबत देऊ शकता.
  • फेसबुक वर जाहिरात चालवू शकता. 

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

जर २० रुपये प्लेट नुसार ढोकळा विकला आणि अर्धा प्रॉफिट हिशोबात धरला. अशा वेळेस जर रोजचे १०० कस्टमर मिळाले तर महिन्याला ३० हजार रुपये कमाई होईल. जास्त कस्टमर मिळाले जर जास्त कमाई होईल. 

👉 व्यवसायातील आव्हाने 

  • व्यवसायासाठी चांगले ठिकाण शोधावं लागेल. 
  • ढोकळ्याची टेस्ट खूप महत्वाची आहे. सुरुवातीला घरात प्रयोग करून बघू शकता. 

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • ढोकळ्याची टेस्ट कशी अजून चांगली करता येईल यावर लक्ष द्या. 
  • वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टी चटण्या बनवून बघा.