मोबाईल वरून करा हे सोपं काम आणि कमवा १ लाख रुपये महिना

आजकाल प्रत्येक जण काहीना काही कन्टेन्ट बनवत आहे जसे की युट्युब व्हिडीओ, युट्युब शॉर्ट, इंस्टाग्राम रील किंवा जाहिरातीचे व्हिडिओ असतील. 

जगभरात असे करोडो क्रिएटर आहे जे अशाप्रकारची कामे करतात आणि त्यातूनच त्यांची कमाई होते. या लोकांना वेगवेगळ्या सर्विसेस ची आवश्यकता असते आणि इथंच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

तुम्ही या लोकांचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकता आणि त्यातून चांगले पैसे कमावू शकता. तुमच्या स्किल नुसार तुम्ही पैसे चार्ज करू शकता. 

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?

या बिजनेसमध्ये तुम्हाला इतरांचे व्हिडिओ एडिट करून द्यायचे आहे आणि त्या बदल्यात पैसे चार्ज करायचे आहे.

YouTubers, Instagram Influencers, Online Coaches किंवा कंटेंट क्रिएटर्स, अशा अनेक लोकांना तुम्ही व्हिडिओ एडिट करून देऊ शकता. 

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागेल ?

  • टूल्स: अनेक फ्री व्हिडिओ एडिटिंग App तुम्हाला Play Store  वर सापडतील ज्यांचा वापर तुम्ही व्हिडिओ एडिट करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर अनेक Free ऑडिओ एडिटिंग अँप देखील या ठिकाणी तुम्हाला मिळतील. 
  • मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन : सुरुवातीला तुम्ही मोबाईल वरून या कामाची सुरुवात करू शकता. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन देखील असले पाहिजे. 
  • नॉलेज आणि स्किल्स: व्हिडिओ एडिटिंग च्या कामाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. यात व्हिडिओ कट्स, ट्रान्झिशन, कलर करेक्शन, ऑडिओ एडिटिंग यांचा समावेश होतो. तुम्ही YouTube वरून फ्री मध्ये या सर्व गोष्टी शिकू शकता. 

👉 मार्केट रिसर्च कसा करावा ?

  • क्लायंट्स: कोणते Creators जास्त व्हिडिओ तयार करतात आणि त्यांना कशा प्रकारच्या एडिटिंगची गरज आहे हे बघा.
  • स्पर्धा: इतर व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस काय चार्ज करत आहेत, ते कोणते टूल्स वापरतात, त्यांचं काम कसं आहे याचा अभ्यास करा.
  • ट्रेंड्स: कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया ट्रेंड्सवर लक्ष ठेवा, कारण त्यावरून व्हिडिओ एडिटिंगच्या गरजा देखील बदलत असतात.

👉 मार्केटिंग कशी करता येईल ?

  • सोशल मीडिया प्रमोशन: Instagram, YouTube, Facebook अशा प्लॅटफॉर्म्सवर तुमचं एडिटिंग स्किल्स दाखवणारे डेमो व्हिडिओ अपलोड करा. व्हिडिओसाठी before-after व्हिडिओज तयार करून ते प्रमोट करा.
  • क्लायंट Testimonials: आधीच्या क्लायंट किंवा कंटेंट Creators चे  Reivew आणि testimonials गोळा करा, जे तुम्हाला नवीन क्लायंट मिळवण्यासाठी मदत करतील.
  • फ्रीलांसिंग प्लॅटफॉर्म्स: Fiverr, Upwork, Freelancer अशा साइट्सवर तुमच्या सर्विस चे प्रमोशन करा.
  • नेटवर्किंग: Content Creators किंवा YouTubers च्या नेटवर्क शी जोडले जाऊन जा याने मार्केट ची डिमांड काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि अनेक नवीन कस्टमर तुम्हाला मिळतील.
  • ई-मेल मार्केटिंग – Creator ला  ई-मेल करू शकता आणि तुमच्या सर्विस ची माहिती देऊ शकता. तुमच्या आधीच्या कामाच्या Link त्या सोबत पाठवू शकता.
  • YouTube मार्केटिंग – एखाद YouTube चॅनेल बनवू शकता आणि कस्टमर मिळवू शकता

👉 किती इन्व्हेस्टमेंट लागेल ?

फ्री टूल्स आणि Apps वापरून तुम्ही अगदी सहज मोबाईल वरून व्हिडिओ एडिट करू शकता. ५ हजार च्या आत या बिजनेस ची सुरुवात तुम्ही करू शकता. 

👉 या व्यवसायातून किती नफा होईल ? 

या ठिकाणी एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्ही १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत तुम्ही चार्ज करू शकता. तुमच्या कामाच्या Quality नुसार तुम्ही जास्त पैसे देखील चार्ज करू शकता. 

एखाद्या Creator सोबत तुम्ही Monthly basis वर देखील काम करू शकता २५,००० ते १ लाख पर्यंत चार्ज करू शकता.

👉 व्यवसायातील आव्हाने

  • क्लायंट्सच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ तयार करणे कधी कधी अवघड जातं.
  • व्हिडिओ एडिटिंग करताना डेडलाईन पूर्ण करणं महत्वाचं असतं.
  • सतत नवीन तंत्रज्ञान शिकणं आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे.

👉 महत्वाच्या टिप्स

  • स्पेशलायझेशन: ठराविक प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग मध्ये Expertise मिळवा, जसे की व्लॉग्स, कॉर्पोरेट व्हिडिओज, किंवा सोशल मीडिया व्हिडिओज.
  • सर्विस अपग्रेड करा: वेगवेगळ्या पॅकेजेस ऑफर करा, जसे बेसिक एडिटिंग, प्रीमियम एडिटिंग, २D/३D एनिमेशन इ.
  • ट्रेंड्सवर फोकस करा: जे ट्रेंडिंग आहे ते वापरून क्लायंट ना त्यांचं कंटेंट अपडेट करायला प्रोत्साहित करा.