आजकाल प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या बिजनेस ची एक वेबसाईट असावी असे वाटत असते आणि म्हणूनच या सर्विस ला मार्केट मध्ये खूप चांगली मागणी आहे.
सुरुवातीला तुम्ही छोट्या व्यवसायांना टार्गेट करू शकता आणि त्यांच्या बिजनेस साठी वेबसाईट बनवून देऊ शकता.
वेबसाईट कशी बनवायची हे तुम्ही ऑनलाईन शिकू शकता आणि या बिजनेस ची सुरुवात करू शकता.
असे अनेक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अगदी सहज वेबसाईट बनवू शकता जसे कि WordPress किंवा Wix
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या व्यवसायात तुम्हाला फक्त लोकांना वेबसाईट बनवून द्यायचे आहे आणि त्या बदल्यात पैसे चार्ज करायचे आहे.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली काही माहिती खालीलप्रमाणे -.
👉 मार्केट रिसर्च करा
फेसबुक तसेच इंस्टाग्राम वर वेबसाईट डेव्हलपमेंटच्या काही जाहिराती तुम्हाला दिसतील ते लोक किती पैसे चार्ज करत आहे आणि त्या बदल्यात कोणकोणत्या गोष्टी देत आहे या गोष्टी तुम्हाला चेक करून बघायचे आहे.
जर तुम्ही फेसबुक वर वेबसाईट डेव्हलपमेंट सारखे शब्द सर्च केले तर तुम्हाला अनेक जाहिराती दिसतील.
👉 हे काम कसं शिकायचं ?
- YouTube वर त्याचे अनेक व्हिडिओस तुम्हाला मिळतील. ते बघून तुम्ही वेबसाईट बनवायला सहज शिकू शकता.
- Google वर देखील त्याचे अनेक आर्टिकल तुम्हाला मिळतील.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- वेबसाईट बनवायचं स्किल
- Domain आणि Hosting
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन
👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
३ ते ७ हजारात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.
👉 कस्टमर कसे मिळतील ?
- फेसबुकचे ग्रुप जॉईन करू शकता ज्यात बिजनेस ची माहिती पोस्ट करू शकता.
- Instagram चा देखील वापर करू शकता ज्यात रील्स आणि पोस्ट करू शकता.
- फेसबुक तसेच इंस्टाग्राम वर Paid Ads देखील चालवू शकता.
- चांगली सर्विस दिली तर Mouth Publicity ने देखील चांगले कस्टमर मिळू शकता.
👉 मार्केटिंग कशी करता येईल ?
- सोशल मीडियावर वेबसाईट चे फायदे लोकांना सांगू शकता
- वेबसाईट मुळे व्यवसाय कसा वाढेल हे लोकांना पटवून देऊ शकता.
- वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता.
👉 वेबसाईट बनवून द्यायचे किती पैसे चार्ज करायचे ?
सामान्यतः तुम्ही अडीच हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत चार्ज करू शकता. वेबसाईट जर थोडी कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही जास्त पैसे देखील चार्ज करू शकता.
जर तुम्ही दुसऱ्या देशातील लोकांना वेबसाईट बनवून दिले तर तुम्ही अनेक पटींनी जास्त पैसे चार्ज करू शकता.
👉 व्यवसायातून किती नफा होईल ?
या ठिकाणी जर तुम्ही अडीच हजार रुपयांची वेबसाईट बनवून दिली तर इथं 1000 ते 1200 रुपये तुमची कमाई होते.
जर तुम्ही पाच हजार रुपयांची वेबसाईट बनवून दिली तर तुमची अडीच ते तीन हजार रुपये कमाई होते.
👉 व्यवसायातील आव्हाने
या ठिकाणी तुम्हाला हे काम शिकण्यासाठी थोडा टाईम द्यावा लागेल.
👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- वेबसाईट बनवून देताना अर्धे पाहिजे आधी घ्या आणि उरलेले काम झाल्यानंतर.
- जोपर्यंत पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत वेबसाईट चे लॉगिन डिटेल्स देऊ नका.
- या कामाचे अनेक व्हिडिओज तुम्हाला युट्युब वर मिळतील त्यातून अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.
- सुरुवातीला फक्त सिम्पल वेबसाईट ऑर्डर घ्या.
- काम घेण्याआधी काय काय बनवून हवं आहे ते नीट विचारा