प्रत्येकजण वापरतो हे प्रॉडक्ट, कमाई ५० हजार महिना 

प्रत्येक घरात टॉवेल, रुमाल, तसेच नॅपकिन ची गरज पडत असते. 

अशा छोट्या गोष्टी जर लोकांना घरपोच मिळाल्या तर लोकांना याचा आनंद होतो. 

तुम्ही एखाद्या होलसेलर कडून या गोष्टी विकत घेऊ शकता आणि तुमच प्रॉफिट मार्जिन ऍड करून वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्याची विक्री करू शकता.

सुरुवातीला कमी माल घेऊन सुरुवात करू शकता. होलसेलर सोबत चांगली ओळख झाली कि त्यांच्याकडून भरपूर सवलती तुम्हाला मिळतील.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या व्यवसायात तुम्हाला रुमाल, नॅपकिन तसेच टॉवेल होलसेल ने विकत घ्यायचे आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून किंवा एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी थांबून त्यांची विक्री करायची आहे.

👉 मार्केट रिसर्च करा 

  • तुमच्या शहरातील वरदळीची ठिकाण शोधून काढा 
  • तुमच्या भागात लोक कशा प्रकारचे रुमाल, नॅपकिन तसेच टॉवेल वापरतात याचे निरीक्षण करा.

👉 होलसेल ने प्रॉडक्ट कुठून घ्यायचे ?  

  • Google वर तुम्हाला अनेक होलसेल सप्लायर किंवा Manufacturer सापडतील.
  • Indiamart.com या वेबसाईटवर देखील तुम्हाला अनेक सप्लायर सापडतील. 
  • मोठ्या शहरांमध्ये देखील याचे अनेक सप्लायर असतात

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • रुमाल, नॅपकिन किंवा टॉवेल
  • एखादी टू व्हीलर किंवा सायकल ( Optional )
  • एखादा भोंगा किंवा स्पीकर

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

5 ते 10 हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.

👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करू शकता ?

  • वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकता. 
  • वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता जसे की एकावर एक रुमाल किंवा टॉवेल फ्री. . 
  • भोंगा किंवा स्पीकर चा वापर करून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता.

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

म्हण्याला २० हजार ते ५० हजार पर्यंत कमाई करू शकता. 

👉 व्यवसायातील आव्हाने 

वेगवेगळ्या भागांमध्ये, शहरांमध्ये तसेच खेडे गावांमध्ये फिरावं लागलं

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

घेतलेले प्रॉडक्ट विकून टाकायचे, किंमत थोडी कमी जास्त करावी लागली तर करायची.