या व्यवसायातून पैसा पण मिळेल आणि प्रसिद्धी पण ! [ कमाई ५०,०००/ महिना ]

तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर अनेक Short Videos तसेच Reels बघत असाल.

अनेक लोक अशा Videos च्या माध्यमातून चांगले पैसे कमवत असतात. याच लोकांना Influencer असं म्हणतात.

तुम्ही याच पद्धतीने Reels बनवून ते Instagram वर अपलोड करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकतात.

Advertising, Affiliate Marketing, Sponsorships अशा अनेक मार्गांनी तुम्ही यातून भरपूर पैसे कमवू शकता.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?

या व्यवसायात सुरुवात करताना, तुम्हाला एखादा ठराविक टॉपिक निवडावा लागेल, ज्या विषयावर तुम्हाला खूप माहिती आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला रस आहे. त्यानंतर, त्या टॉपिक वर कंटेंट तयार करावा लागतो आणि तो Instagram वर पोस्ट करावा लागतो जसे कि Reels असतील किंवा Images असतील

म्हणजे एकदा का चांगले Views यायला लागले कि तुम्ही वेगवेगळे Products किंवा ब्रँड चे प्रमोशन करून पैसे कमावू शकता.

👉 मार्केट रिसर्च करा

तुमच्या निवडलेल्या टॉपिक वर काम करणारे इतर Instagram Influencers शोधा. ते कोणत्या प्रकारचे कंटेंट तयार करतात, किती फॉलोअर्स आहेत, आणि त्यांच्या पोस्ट्सवर कसा रिस्पॉन्स येतो याचा अभ्यास करा. 

तुम्हाला तुमच्या टॉपिक मध्ये स्पर्धा कमी आहे का किंवा तुम्ही काही वेगळं देऊ शकता का, हे बघा.

👉 कोणत्या टॉपिकवर कंटेंट बनवू शकता ?

फॅशन, ब्युटी, फिटनेस, ट्रॅव्हल, फूड, लाइफस्टाइल, हेल्थ, आणि बिझनेस हे काही लोकप्रिय टॉपिक आहेत जिथे तुम्ही Influencer म्हणून काम करायला सुरुवात करू शकता. 

पण हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे निवडाल, ते तुमच्या आवडीचे आणि तुमच्या क्षमतेचे असावे.

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन हे सर्वात महत्वाचे साधन आहे. 
  • फोटो एडिट करण्यासाठी ॲप्सची आवश्यकता असेल. ( Free Mobile Apps ) 
  • तसेच, तुम्ही ओळख निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट शैली आणि नियमितपणे पोस्ट करणं गरजेचं आहे.

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?


तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. चांगला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असेल तरी याची सुरुवात तुम्ही करू शकता. 

जर थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एखादा माईक घेऊ शकता. 

तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला कि मग तुम्ही काही अतिरिक्त इन्व्हेस्टमेंट करून कॅमेरा, लाइट्स, इतर उपकरणे विकत घेऊ शकता.

👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?

  • इन्स्टाग्रामवर चांगला फॉलोअर्स बेस तयार केल्यानंतर, तुम्हाला विविध ब्रँड्स कडून प्रमोशनसाठी ऑफर्स येऊ लागतील. 
  • तुमच्या प्रोफाइलवर चांगल्या फॉलोअर्सची संख्या आणि एंगेजमेंट असल्यास, कंपन्या स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. तसेच, तुम्ही स्वतःही वेगवेगळ्या ब्रँड्सशी संपर्क साधू शकता आणि त्यांना तुमची सेवा ऑफर करू शकता.
  • कस्टमर मिळवण्यासाठी तुमचा कंटेंट सातत्याने अपलोड करा, त्याला आकर्षक कॅप्शन द्या आणि योग्य हॅशटॅग्स वापरा. 
  • तुमच्या फॉलोअर्ससोबत नेहमी कनेक्टेड राहा, त्यांच्या कमेंट्सला उत्तर द्या, आणि वेळोवेळी काही स्पर्धा किंवा giveaways आयोजित करून एंगेजमेंट वाढवा.

👉 या व्यवसायातून किती नफा होईल ?

प्रारंभी छोट्या ब्रँड्सकडून तुम्हाला प्रॉडक्ट्स किंवा कमी पेमेंट मिळेल. मात्र, फॉलोअर्सची संख्या वाढल्यावर आणि तुमची ओळख पक्की झाल्यावर, तुम्ही एका प्रमोशन पोस्टसाठी ५ हजार ते ५० हजार किंवा अधिक कमवू शकता.

👉 व्यवसायातील आव्हाने

  • Instagram Influencer म्हणून टिकून राहण्यासाठी नियमितपणे क्रिएटिव कंटेंट तयार करणे आवश्यक आहे. 
  • नवनवीन ट्रेंड्स फॉलो करणे, एंगेजमेंट वाढवणे आणि सतत आपल्या ऑडियन्स च्या संपर्कात राहणं हे सगळं कठीण असू शकते. 
  • स्पर्धा जास्त असल्यामुळे, तुमचं स्वतःचं वेगळेपण दाखवणं महत्त्वाचं आहे.

👉 या बिझनेस महत्वाच्या टिप्स

  • तुमच्या ऑडीयन्स ला कोणत्या प्रकारचे रील्स आणि पोस्ट आवडतात यावर लक्ष ठेवा. 
  • तुमच्या कंटेंटमध्ये Creativity आणि वेगळेपण ठेवा.
  • सुरुवातीला ब्रँडशी फ्री मध्ये किंवा कमी रेट मध्ये काम करा, ज्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल.
  • नियमितपणे तुमच्या फॉलोअर्स शी संवाद साधा, त्यांना तुमच्या कंटेंट मध्ये गुंतवा