आज-काल कोणाला काही खायचं असेल तर लोक घरबसल्या Zomato, Swiggy यांसारख्या App वरून ऑर्डर देतात.
तुम्हाला जर काही चांगले पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही घर बसल्या या App वर रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं ऑनलाईन हॉटेल सुरु करू शकता.
यावर ऑर्डर आली कि डिलिव्हरी करणारा व्यक्ती तुमच्या घरी येऊन पदार्थ घेऊन जाईल आणि तुमच्या कस्टमर ला देईल.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या व्यवसायात तुम्हाला घरबसल्या पदार्थ बनवायचे आहे आणि फूड डिलिव्हरी ॲप तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यांची विक्री करायची आहे.
👉 मार्केट रिसर्च करा
तुमच्या भागातील हॉटेल तसेच रेस्टॉरंट मध्ये कोणकोणते पदार्थ विकले जातात त्याची लिस्ट बनवा.
तुमच्या शहरांमध्ये कोणकोणत स्ट्रीट फूड विकला जात ते बघा
👉 पदार्थ कसे बनवायचे ?
अनेक लोक हे पदार्थ कसे बनवायचे हे शिकवत आहे तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता.
पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील महिलांची मदत घेऊ शकता.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि भांडे
- पॅकिंग चे सामान, पार्सल पाठवण्यासाठी पॅकेट किंवा फूड बॉक्सेस
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन
👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
पाच ते सात हजारात तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
👉 कस्टमर कसे मिळतील ?
- झोमॅटो तसेच स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी ॲप वर तुम्ही तुमचा बिझनेस लिस्ट करू शकता.
- फेसबुक तसेच इंस्टाग्राम वर तुम्ही जाहिरात करू शकता.
- या ठिकाणी Successful होण्यासाठी तुमच्या पदार्थांच्या Images अत्यंत आकर्षक असल्या पाहिजे कारण कोणताही व्यक्ती सर्वात आधी तुमच्या या पदार्थांच्या Images बघतो. Images बघून लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि त्यांना तो पदार्थ खावासा वाटला पाहिजे.
- कमी प्रॉमिस करा आणि जास्त डिलिव्हर करा
- तुमच्या पदार्थांची टेस्ट सर्वात महत्त्वाची आहे कारण त्यानेच तुम्हाला रिपीट बिजनेस मिळेल.
👉 व्यवसायातून किती नफा होईल ?
या बिझनेस मधून तुम्ही महिन्याला 20 हजार ते 60 हजार रुपये कमवू शकता.
👉 व्यवसायातील आव्हाने
ऑनलाइन मार्केटिंग करता येणे गरजेचे आहे.
👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- झोमॅटो आणि स्विगी हे ॲप कसे काम करतात याचा व्यवस्थित अभ्यास करा.
- प्रयोग करून बघा.