रोज संध्याकाळी थोडावेळ काम, महिना ६० हजार कमाई

पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते. तुम्ही तुमच्या आसपास बघत असाल की अनेक लोक रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकत आहे.

या पाणीपुरी स्टॉलच्या आसपास तुफान गर्दी असते. हा एक असा पदार्थ ज्याला मार्केटमध्ये तुफान मागणी आहे. 

अतिशय कमी गुंतवणुकीत या व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? : 

या व्यवसायात तुम्हाला लोकांना पाणीपुरी बनवून द्यायची आहे आणि त्यातून कमाई करायची आहे.

👉 मार्केट रिसर्च करा 

तुमच्या भागात जे इतर लोक पाणीपुरी विकत आहे ते कोणत्या भागात विकत आहे. 

इतर लोक कोणकोणत्या प्रकारच्या पाणीपुरी देत आहे. 

तुमच्या भागात दिवसाच्या कोणत्या वेळेस लोक पाणीपुरी खातात हे शोधून काढा.

👉 व्यवसायाचे सामान कुठून घ्यायचे ?  

अनेक कंपन्या या व्यवसायाचा संपूर्ण सेटअप देतात ज्यात सर्व गोष्टी असतात. पण त्यासाठी थोडी जास्त इन्वेस्टमेंट करावी लागू शकते.

किंवा सुरुवातीला तुम्ही आसपासच्या दुकानांमधून या सर्व वस्तू विकत घेऊ शकता आणि व्यवसाय सुरु करू शकता. 

👉 काम कुठून शिकायचे 

पाणीपुरी कशी बनवायची याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला युट्युब वर मिळतील. ते बघून आधी घरी प्रयोग करू शकता आणि मग व्यवसायाची सुरुवात करू शकता.

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
  • टेबल तसेच दोन खुर्च्या ( घरातील वापरू शकता )
  • एक मोठी छत्री ( उन्हात काम करणार असाल तर )
  • कामासाठी लागणारे काही भांडे

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

हा व्यवसाय तुम्ही पाच ते दहा हजारात सुरू करू शकता.

👉 कस्टमर कसे मिळतील ?

या व्यवसायात तुमच्या पाणीपुरी स्टॉलचे लोकेशन अतिशय महत्त्वाच आहे.

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, शाळा किंवा कॉलेज जवळ, रेल्वे किंवा बस स्टॅन्ड जवळ स्टॉल लावू शकता. 

👉 मार्केटिंग कशी करता येईल ?

  • वेगवेगळ्या फ्लेवर च्या पाणीपुरी तुम्ही विकू शकता.
  • वेगवेगळ्या ऑफर तुम्ही देऊ शकता जसे की 50 रुपयात किंवा 70 रुपयात अनलिमिटेड पाणीपुरी.
  • रेगुलर कस्टमरला एखाद्या दिवशी फ्री पाणीपुरी देऊ शकता.
  • सुरुवातीला सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता.

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

या बिजनेस मधून तुम्ही महिन्याला 30 हजार ते 60 हजार रुपयापर्यंत कमाई करू शकता.

👉 व्यवसायातील आव्हाने 

  • चांगली पाणीपुरी बनवता येणे गरजेचे आहे 
  • व्यवसायासाठी चांगलं ठिकाण मिळणे गरजेचे आहे

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स

  • स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे
  • या बिझनेस मध्ये तुमच्या पदार्थाची टेस्ट सर्वात महत्त्वाची ठरते.
  • चालता चालता अगदी सहज ही पाणीपुरी लोकांना खाता आली पाहिजे.