छोटे प्रॉडक्ट – मोठा पैसा, कमवा ५० हजार महिना 

प्रत्येक घरातील किचनमध्ये अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात आणि महिलांना त्या प्रॉडक्ट खूप आकर्षण असतं. 

मार्केट मध्ये या प्रॉडक्ट ला चांगली डिमांड असते त्यामुळे तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

किचन मधील छोटे छोटे प्रॉडक्ट विकण्याचं काम तुम्ही करू शकता जसे की कप-बशी, चमचे, वाट्या, ग्लास, छोटे मोठे डबे, चाकू, लाइटर.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या व्यवसायात तुम्हाला एखाद्या होलसेलर कडून स्वस्तात हे प्रॉडक्ट घ्यायचे आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्याची विक्री करायची आहे. 

👉 मार्केट रिसर्च करा 

मार्केट मध्ये तुम्हाला असे अनेक लोक दिसतील जे असे प्रॉडक्ट विकत आहे. त्या लोकांकडे जाऊन ते कोणकोणते प्रॉडक्ट विकत आहे याचे निरीक्षण करा.

तुमच्या घरात किचन मध्ये किंवा आसपासच्या ओळखीच्या लोकांच्या किचनमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट वापरले जातात ते बघा. 

👉 होलसेल ने प्रॉडक्ट कुठून घ्यायचे ?  

  • Google वर होलसेल सप्लायर तुम्हाला अगदी सहज सापडतील. 
  • इंडिया मार्ट नावाच्या वेबसाईट वर देखील तुम्हाला अनेक होलसेल सप्लायर सापडतील. 

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • विक्री करण्यासाठी प्रॉडक्ट
  • एखादी बाइक,सायकल किंवा हातगाडी ( फिरण्यासाठी )
  • एखादा भोंगा किंवा स्पीकर ( फिरताना लोकांना आवाज देण्यासाठी )

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

 ८ ते १० हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.

👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करायची ?

  • लोकांना आवश्यक असलेले प्रॉडक्ट योग्य किमतीत द्या 
  • वेगवेगळ्या भागात फिरणं गरजेचं आहे
  • शहराच्या ज्या भागात जास्त दुकान नाही अशा भागाला टार्गेट करू शकता. 
  • खेडेगावांमधून देखील चांगले कस्टमर तुम्हाला मिळतील.
  • भोंग्याचा योग्य वापर करा – त्यावर काही आकर्षक गाणे किंवा ऑफर लोकांना सांगा ज्याने लोक आकर्षित होतील. लोकांचे लक्ष वेधून घ्या

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

२० हजार ते ५० हजार पर्यंत महिन्याला कमाई करू शकता. विक्री करण्याच्या क्षमतेवर कमाई अवलंबून असते. 

👉 व्यवसायातील आव्हाने 

दिवसभर वेगवेगळ्या भागात फिरावं लागलं.

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • सुरुवात करण्याआधी  कोणत्या प्रॉडक्ट ची चांगली विक्री होते हे आधी शोधून काढा आणि फक्त तेच प्रॉडक्ट विकत घ्या.
  • लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरा