जग डिजिटल होत आहे. एका ताजा संशोधनानुसार एक सामान्य माणूस रोज चार ते पाच तास इंटरनेटचा वापर करतो आणि हा नंबर खूप वेगाने वाढत आहे.
आजकाल प्रत्येक व्यवसायात डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज बनली आहे.
तुम्ही डिजिटल मार्केटिंग करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता किंवा तुम्ही इतरांना डिजिटल मार्केटिंग ची सर्व्हिस देऊ शकता.
आजकाल प्रत्येक व्यवसायिक त्याच्या उत्पादनांची आणि सेवांचे विक्री करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर करू इच्छित आहे.
फक्त समस्या अशी आहे की त्यांना डिजिटल मार्केटिंग कशी करावी हे माहित नाही, परंतु तुम्ही त्यांना डिजिटल मार्केटिंग ची सर्विस देऊ शकता आणि त्याद्वारे चांगले पैसे कमवू शकता.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
डिजिटल मार्केटिंग सर्विस म्हणजे इतर कंपन्यांच्या किंवा व्यक्तींच्या प्रॉडक्ट ची किंवा सर्विस ची ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात किंवा मार्केटिंग करून देणे.
यात सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), पे-पर-क्लिक (PPC), कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागेल ?
- नॉलेज आणि स्किल्स: डिजिटल मार्केटिंगचे तंत्रज्ञान, ट्रेंड्स, आणि प्लॅटफॉर्म्स समजून घेणं महत्त्वाचं आहे. Google Analytics, Facebook Ads, SEO, Content Creation अशा सर्व गोष्टींमध्ये चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- टूल्स आणि सॉफ्टवेअर: डिजिटल मार्केटिंगसाठी अनेक टूल्स वापरली जातात जसे की Google Ads, Facebook Ads, Instagram Ads, Mailchimp, Canva इत्यादी. या सॉफ्टवेअरचे चांगले ज्ञान असावे.
- वेबसाइट आणि सोशल मीडिया: तुमचा स्वतःचं पोर्टफोलिओ दाखवणारी वेबसाइट असावी. तसेच सोशल मीडियावर सक्रिय असणं गरजेचं आहे.
👉 मार्केट रिसर्च कसा करावा ?
- कोणत्या उद्योगांमध्ये डिजिटल मार्केटिंगची गरज जास्त आहे याचा अभ्यास करा.
- स्पर्धकांची सर्विस, त्यांचे रेट्स, आणि त्यांची स्ट्रॅटेजी जाणून घ्या.
- लोक कोणत्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक वेळ घालवत आहेत, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा Linkedin यावर रिसर्च करा.
👉 मार्केटिंग कशी करता येईल ?
- सोशल मीडिया मार्केटिंग: तुमची सर्विस सोशल मीडियावर प्रमोट करा. Instagram, LinkedIn, Facebook सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तुमचं काम दाखवणं खूप प्रभावी ठरेल.
- वेबसाइट आणि ब्लॉग: तुमच्या वेबसाइटवर रेग्युलर ब्लॉग पोस्ट करा ज्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे नवीन ट्रेंड्स, केस स्टडीज किंवा टिप्स दिल्या जातील.
- रेफरल्स आणि नेटवर्किंग: नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा, इतर बिझनेस ओनर्सशी संपर्क साधा आणि रेफरल्समधून काम मिळवण्याचा प्रयत्न करा.
- ईमेल मार्केटिंग: कंपन्यांच्या संपर्क लिस्ट तयार करून त्यांना ई-मेलद्वारे तुमच्या सेवांची माहिती द्या.
👉 किती इन्व्हेस्टमेंट लागेल ?
डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कमी लागते. अनेक फ्री टूल्स असतात ज्यांचा वापर करून ५ ते ७ हजारात या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.
👉 या व्यवसायातून किती नफा होईल ?
प्रत्येक प्रोजेक्टनुसार तुम्हाला ₹१०,००० ते ₹५०,००० पर्यंत मिळू शकता. जर कस्टमर ला चांगले Result मिळाले तर ते नियमितपणे तुमची सर्विस घेतील.
👉 व्यवसायातील आव्हाने
- तुमचं पोर्टफोलिओ आणि कामाची गुणवत्ता यावर भर देणं गरजेचं आहे.
- डिजिटल मार्केटिंगमध्ये सतत नवीन ट्रेंड्स येत असतात, त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकत राहणं आवश्यक आहे.
👉 महत्वाच्या टिप्स
- केस स्टडीज दाखवा: तुमच्या यशस्वी प्रोजेक्ट्सची केस स्टडी बनवा आणि ती क्लायंट्सना दाखवा.
- फोकस कंझ्युमर बेस: ज्या उद्योगांना डिजिटल मार्केटिंगची जास्त गरज आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, छोटे व्यवसाय, स्थानिक दुकाने, ऑनलाइन स्टोअर्स इत्यादी.
- Skills: डिजिटल मार्केटिंग मधील नवीन टूल्स आणि Technology शिकत राहा.