जुन्या काळात जर कोणाला दागिने खरेदी करायचे असतील, तर त्यांना खूप मोठी रक्कम खर्च करावी लागत असे पण आजकाल लोकांना स्वस्तात दागिने खरेदी करता येतात.
आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे दागिने, जे सोने किंवा चांदीसारख्या महागड्या धातूंऐवजी इतर स्वस्त आणि आकर्षक धातूंनी तयार केलेले असतात.
कमी किमतीत अधिक आकर्षक डिझाईन्स मिळवता येतात, जे महिला आणि तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय असतात.
आर्टिफिशियल दागिने अत्यंत स्वस्त किंमतीत खरेदी करता येतात. सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या तुलनेत ते सुरक्षित पण असतात.
तुम्ही हे असे फॅशन ज्वेलरी ( Artificial Jewellery ) विकण्याचे काम करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.
👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
या व्यवसायात तुम्हाला होलसेल ने आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करायची आहे आणि वेगवेगळ्या भागात फिरून किंवा Social Media चा वापर करून त्याची विक्री करायची आहे.
तुमच्या नेटवर्क मधील ओळखीच्या महिला तसेच मुलींपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता.
👉 होलसेल सप्लायर कुठं मिळतील ?
- स्थानिक होलसेल बाजार: भारतात असे अनेक होलसेल मार्केट आहेत जसे की मुंबईतील झवेरी बाजार, दिल्लीतील चांदनी चौक, आणि जयपूर याठिकाणी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे दागिने सस्त्यात मिळतील. तुमच्या आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये देखील याचे भरपूर सप्लायर तुम्हाला सापडतील.
- ऑनलाइन सप्लायर्स: Indiamart, TradeIndia सारख्या वेबसाईट देखील तुम्हाला भरपूर होलसेल सप्लायर सापडतील.
- Google वर सर्च करून देखील याचे भरपूर सप्लायर तुम्हाला सापडतील.
👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागेल ?
- Social Media – तुम्ही Social Media चा वापर करून देखील याची विक्री करू शकता त्यासाठी Social Media वर Active राहणं गरजेचं आहे.
- इन्व्हेंटरी: छोट्या-छोट्या विविध डिझाईन्सची इन्व्हेंटरी तयार ठेवा, जसे की नेकलेस, कंगन, इयररिंग्स, अंगठ्या.
- पॅकेजिंग आणि शिपिंग: आकर्षक पॅकेजिंग आणि सोयीस्कर शिपिंगची व्यवस्था करा.
👉 मार्केट रिसर्च कसा करावा ?
- टार्गेट ऑडियन्स: या ठिकाणी मुख्यतः महिलांना टार्गेट करा, विशेषतः १६-४५ वर्ष वयोगटातील महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरी खूप आवडते. त्यातही महाविद्यालयीन मुली, वर्किंग प्रोफेशनल्स आणि लग्नसमारंभाच्या तयारीत असणाऱ्या महिलांचा अभ्यास करा.
- स्पर्धा: Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर विकली जाणारी ज्वेलरी पहा. त्यांचे प्रोडक्ट्स, किंमती, ग्राहकांचे Reviews याचा अभ्यास करा.
- ट्रेंड्स: सध्या कोणते दागिने ट्रेंडमध्ये आहेत हे सोशल मीडियावरुन शोधा, जसे की Instagram वर ट्रेंडी डिझाइन्स, Influencers कोणते दागिने प्रमोट करत आहेत ते पहा.
👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?
- सोशल मीडिया प्रमोशन: Instagram, Facebook, आणि Pinterest सारख्या प्लॅटफॉर्मवर ज्वेलरी प्रमोट करा. आकर्षक फोटो, व्हिडिओ आणि शॉर्ट Reels बनवून पोस्ट करा.
- Influencer Marketing: लोकप्रिय Influencer किंवा फॅशन ब्लॉगर्स शी संपर्क साधा. त्यांच्याकडून तुमच्या ज्वेलरीचे प्रमोशन करून घ्या.
- ऑनलाइन मार्केटप्लेस वापरा: तुमचे प्रोडक्ट्स Amazon, Flipkart, Meesho यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विकायला ठेवा. याशिवाय तुमचा स्वतःचा Shopify किंवा WooCommerce स्टोअर देखील बनवू शकता.
- WhatsApp आणि Facebook ग्रुप्स: आपल्या शेजारच्या लोकांमध्ये किंवा मित्रांमध्ये ज्वेलरी प्रमोट करण्यासाठी WhatsApp ग्रुप्स आणि Facebook ग्रुप्सचा उपयोग करा.
- फिरून विक्री – तुम्ही वेगवेगळ्या भागात फिरून देखील याची विक्री करू शकता.
👉 किती इन्व्हेस्टमेंट लागेल ?
सुरुवातीला कमी प्रॉडक्ट विकत घेऊन या बिजनेस ची सुरुवात करू शकता.
➡️ एखाद्या दुकानदारासोबत पार्टनरशिप मध्ये सुरुवात करू शतक जेणेकरून स्टॉक घेण्याची गरज पडणार नाही.
ज्वेलरी च्या इमेजेस वापरून मार्केटिंग करू शकता आणि बदल्यात प्रॉफिट मधील काही टक्के घेऊ शकता.
अशा प्रकारे १० हजार च्या आत हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता.
👉 या व्यवसायातून किती नफा होईल ?
प्रत्येक दागिन्याची विक्री किंमत घाऊक किमतीच्या ३०% ते १००% जास्त असू शकते.
जर तुम्हाला विक्री करता आली तर महिना २० हजार ते १ लाख पर्यंतची कमाई तुम्ही करू शकता.
👉 व्यवसायातील आव्हाने
- ऑनलाइन मार्केटिंगसाठी वेळ आणि पैसे गुंतवावे लागतात.
- ग्राहकांच्या अपेक्षेनुसार गुणवत्तेची पूर्तता करणे महत्वाचे असते.
👉 महत्वाच्या टिप्स
- सण आणि समारंभ लक्षात ठेवा: सणांच्या काळात जसे की दिवाळी, नवरात्र, लग्नसराई यावेळी जास्त विक्री होत असते, त्यावेळी स्पेशल ऑफर्स आणि कलेक्शन्स काढा.
- युनिक डिझाइन्स: वेगळे आणि युनिक डिझाइन्स ऑफर करा, ज्यामुळे ग्राहक आकर्षित होतील.
- ग्राहकांना फॉलोअप: तुमचे जुने ग्राहक कोणते दागिने पसंत करतात, त्यावरून त्यांना परत ऑफर पाठवा.