जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ३१ Business Idea सांगणार आहे. यातील अनेक व्यवसाय तुम्ही घरबसल्या देखील करू शकता.
घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Home Based Business Ideas For Women Marathi )
1. घरबसल्या साड्यांची विक्री करणे ( Saree Selling From Home )
भारतामध्ये 66 करोड पेक्षा जास्त महिला आहेत आणि भारतीय महिलांचे प्रमुख वस्त्र हे साडी आहे. भारतातील महिला मोठ्या प्रमाणावर साड्या वापरतात आणि म्हणूनच तुम्ही पंचवीस ते तीस हजारांमध्ये घर बसल्या साड्या विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता.
तुम्ही सुरत बंगलोर मुंबई दिल्ली लुधियाना या ठिकाणांवरून होलसेल ने साड्या विकत घेऊ शकता आणि घर बसल्या त्यांची विक्री करू शकता.
तुमच्या कॉलनीतील महिला आणि तुमच्या शहरातील इतर ओळखीच्या महिलांना तुम्ही साड्यांची विक्री करू शकता.
व्यवसाय चालू लागल्यावर तुम्ही भविष्यामध्ये साड्यांचे दुकान देखील उघडू शकता.
2. लहान मुलं सांभाळण्याचा व्यवसाय ( Babysiter Service )
आजकाल शहरांमध्ये घरातील नवरा-बायको दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांची लहान मुलं कशी सांभाळावी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक महिला लहान मुलं सांभाळण्याचा व्यवसाय करून महिन्याला अतिशय चांगले पैसे कमवत आहे.
तुम्ही घर बसल्या लहान मुलं सांभाळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्वेस्टमेंट करायची गरज नाही.
व्यवसाय चालायला लागल्यावर तुम्ही हाताखाली इतर महिला देखील कामाला ठेवू शकता. भविष्यात तुम्ही स्वतःची नर्सरी स्कूल देखील सुरू करू शकता.
3. घरगुती लॉन्ड्री ( Home laundry )
शहरांमध्ये लोक जॉब निमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्वतःच्या घरापासून लांब आलेले असतात त्यामुळे त्यांना लॉन्ड्री सर्विस ची नेहमीच गरज भासत असते. त्याच बरोबर आज-काल कपल्स आणि फॅमिली मेंबर्स देखील लॉन्ड्री सर्विस चा वापर करतात.
तुम्ही घर बसल्या स्वतःची होम लॉन्ड्री सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील.
4. टिफिन सर्विस ( Tiffin Business )
कोणताही व्यक्ती अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही. मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक लोक टिफिन च्या सर्विस मधून अतिशय चांगले पैसे कमवत आहे. ही एक गरजेची सेवा आहे आणि हा व्यवसाय कधीही बंद होणार नाही.
अनेक Bacholoers, Couples, वयस्कर वृद्ध लोक असे भरपूर कस्टमर तुम्हाला मिळतील या व्यवसायातून तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये महिना आरामात कमाऊ शकता.
5. मेहंदी सर्विस ( Mehandi Business )
भारतातील महिलांना मेहंदी प्रचंड आवडते. लग्नकार्य असो, एखादं सेलिब्रेशन असो, पार्टी असो किंवा इतर सण समारंभ असो भारतातील महिला आवडीने मेहंदी लावतात.
प्रत्येकालाच आकर्षक अशी मेहंदी काढता येत नाही
शहरांमध्ये महिला मेहंदी लावून देण्याचा व्यवसाय करत आहे. अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांची आणि लग्नांच्या ऑर्डर त्यांना मिळत आहे आणि यातून ते अतिशय चांगले पैसे कमावत आहे. तुम्हाला जर चांगली मेहंदी काढता येत असेल तर तुम्ही देखील मेहंदी सर्विस देणे सुरू करू शकता.
6. आर्टिफिशियल ज्वेलरी विकणे ( Artificial Jwellery Selling )
भारतातील महिलांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे परंतु आज-काल सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे आणि वापरणे परवडत नाही त्यामुळे बहुतेक महिला या आर्टिफिशियल ज्वेलरी ला प्राधान्य देतात.
आर्टिफिशियल ज्वेलरी ही स्वस्त देखील असते, टिकाऊ देखील असते आणि वापरायला सुरक्षित देखील असते.
तुम्ही होलसेल ने आर्टिफिशियल ज्वेलरी विकत घेऊ शकता आणि घरबसल्या त्याची विक्री करू शकता. भविष्यात तुम्ही Amazon आणि Flipkart यांसारख्या वेबसाईटवर Online देखील आर्टिफिशल ज्वेलरी विकू शकता किंवा तुम्ही एखादं दुकान देखील सुरू करू शकता.
7. महिलांचे प्रॉडक्ट आणि ॲक्सेसरीज विकणे ( Women Products & Accessories Selling )
महिला हजारो Products आणि Accessories वापरतात आणि म्हणूनच या Products ची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहेआणि ही दिवसेंदिवस अजूनच वाढत आहे.
तुम्ही 5,000 ते 10,000 रुपयांमध्ये महिलांचे Products आणि Accessories विकण्याचा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता.
व्यवसाय चालायला लागल्यावर तुम्ही स्वतःचं दुकान देखील सुरू करू शकता तुम्ही Online देखील महिलांचे Products आणि Accessories विकू शकता किंवा तुम्ही Manufacturing मध्ये देखील करू शकता.
महिलांसाठी दुकान व्यवसाय ( Small Shop Business Ideas for Housewife In India )
8. नाश्ता सेंटर ( Breakfast Corner )
तुम्ही स्वतःचे नाश्ता सेंटर सुरू करू शकता. हा व्यवसाय अतिशय सोपा आहे आणि जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. महिलांना खाद्य पदार्थ बनवता येतात आणि याच तुमच्या स्किल चा वापर करून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता.
शहरातील लहान सहान नाष्टा सेंटर देखील महिन्याला लाखो रुपये कमावतात. शहरातील Street Food वाले देखील लाखो रुपये महिना कमावतात. तुम्ही एखादा गाळा भाड्याने घेऊन स्वतःचा नाष्टा सेंटर सुरू करू शकता किंवा तुम्ही एखादा स्टॉल लावून देखील तुमचं नाश्ता सेंटर सुरू करू शकता.
9. किराणा दुकान (Grocery Shop )
प्रत्येक कॉलनी मध्ये एक तरी किराणा दुकान असतं. प्रत्येक घराला, कुटुंबाला दर महिन्याला किराणा सामान खरेदी करावं लागतं. तुम्ही तुमच्या भागामध्ये एखादा छोट किराणा दुकान सुरू करू शकता.
किराणा दुकान ही एक अत्यावश्यक सेवा आहे.
तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये चांगल्या Quality चे सामान ठेवायचा आहे. तुम्हाला तुमच्या कस्टमर सोबत चांगली ओळख निर्माण करायची आहे. हा एक असा धंदा आहे ज्यात तुम्हाला रिपीट कस्टमर मिळत राहतील.
10. गिफ्ट स्टोअर ( Gift Store )
आज-काल एकमेकांना गिफ्ट देण्याचा ट्रेंड आहे. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये देखील एकमेकांना गिफ्ट दिले जातात. वाढदिवस असो, लग्नकार्य असो किंवा एखादा सण-समारंभ असो लोक आनंदाने एकमेकांना गिफ्ट देतात.
तुम्ही स्वतःचं गिफ्ट शॉप सुरू करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे आकर्षक गिफ्ट विकून त्यातून चांगले पैसे कमवू शकता.
11. ब्युटी पार्लर ( Beauty Parlor )
ब्युटी पार्लर ही महिलांसाठी एक गरजेची सेवा आहे. महिलांना या सर्व्हिसेसचे नेहमीच गरज भासत असते.
तुम्ही स्वतःच ब्युटी पार्लर सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला आधी हे स्किल शिकणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही एखादा ब्युटी पार्लरचा छोटासा कोर्स करू शकता.
तुमच्याकडं जर स्वतःचे दुकान सुरू करण्याइतके पैसे नसतील तर तुम्ही घर बसल्या देखील ही सर्व्हिस देऊ शकता आणि पैसे येऊ लागल्यावर स्वतःचा एखादा गाळा भाड्याने घेऊ आता शकता.
Teaching आणि Education शी संबंधित व्यवसाय ( Education & Teaching Related Business Ideas For Women Marathi )
12. ट्युशन क्लासेस ( Tuition classes )
भारताची Education इंडस्ट्री ही खूप वेगाने मोठी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही इंडस्ट्री अजूनच मोठी होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे.
तुम्ही ट्यूशन क्लासेस सुरू करू शकता. ट्युशन क्लासेस मधून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता अनेक शहरांमध्ये ट्युशन क्लासेस मधून लोक वर्षाला करोडो रुपये देखील कमवत आहे.
तुम्ही पहिली ते चौथी चे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही पाचवी ते दहावी चे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही अकरावी बारावी क्लास घेऊ शकता.
तुम्ही इतर Field चे क्लासेस घेऊ शकता जसे की तुम्ही law चे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही CA चे क्लासेस घेऊ शकता.
13. योगा क्लासेस ( Yoga classes )
Health Sector मध्ये प्रचंड संधी आहे. आजच्या काळात प्रत्येकाची हेल्थ ही अत्यंत खराब झालेली आहे. आपलं खानपान आणि लाइफस्टाइल अशी झालेली आहे की लोकांची हेल्थ ही खराब होणारच आहे. त्यात अनेक वेगवेगळे Virus येतात.
हेल्थ सेक्टर च भविष्य हे एकदम उज्ज्वल आहे. तुम्ही योगा क्लासेस सुरू करू शकता. योगा क्लासेस सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला योगा येणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही एखादा योगाचा कोर्स करू शकता किंवा आजकाल तुम्ही ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून देखील योगा शिकू शकतात.
14. कुकिंग क्लासेस ( Cooking Classes )
तुम्हाला जर चांगली कुकिंग येत असेल किंवा तुम्हाला वेगवेगळे मेनू बनवता येत असतील तर तुम्ही कुकिंग क्लासेस सुरू करू शकता.
हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही.
15. डान्स क्लासेस ( Dance Classes )
तुम्हाला जर चांगला डान्स करता येत असेल किंवा डास मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डान्स क्लासेस सुरू करू शकता.
अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स स्टाईल मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला जी स्टाईल येत असेल ती तुम्ही शिकवू शकता. आजकाल अनेक लोक व्यायाम म्हणून देखील डान्स क्लासेस जॉईन करतात.
हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वतःला डान्स करता येणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही एखादा कोर्स करू शकता किंवा इंटरनेटच्या माध्यमातून फ्री मध्ये देखील सर्व काही शिकवू शकतात.
16. झुंबा क्लासेस ( Zumba Classes )
शहरांमध्ये झुंबा क्लासेस देखील अतिशय प्रसिद्ध आहे. झुंबा हा एक डान्स आणि फिटनेस च कॉम्बिनेशन आहे. यामध्ये डान्स च्या माध्यमातून व्यायाम केला जातो. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या शहरात किंवा आसपासच्या शहरांमध्ये अनेक Zumba क्लासेस सापडतील.
क्लास सुरू करण्याआधी तुम्हाला स्वतःला झुम्बा डान्स शिकावा लागेल त्यासाठी तुम्ही आधी इतर एखादा क्लास जॉईन करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन देखील शिकू शकता.
तुम्ही तुमच्या शहरातील महिलांना Zumba शिकवू शकता. तुम्ही ऑनलाईन देखील झुंबा क्लासेस घेऊन त्यातून अतिशय चांगले पैसे कमावू शकता.
महिलांसाठी ऑनलाईन व्यवसाय ( Online Business Ideas For Women/Ladies In Marathi )
17. कंटेंट रायटिंग ( Content Writing )
तुम्हाला जर चांगलं लिहिता येत असेल तर तुम्ही कंटेंट रायटर म्हणून देखील काम करू शकता. आता हे जे आर्टिकल तुम्ही वाचत आहे अशा प्रकारचे आर्टिकल तुम्ही लिहू शकता.
तुम्हाला ज्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट असेल, ज्या Topic च तुम्हाला ज्ञान असेल त्या टॉपिक वर तुम्ही आर्टिकल्स लिहून त्यातून चांगले पैसे कमावू शकता.
इंटरनेटवरील अनेक मोठ्या Blog साठी तुम्ही Content Writer म्हणून काम करू शकता.
18. अमेझॉन सेलर ( Amazon Seller )
अमेझॉन ही जगातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. करोडो लोक दररोज ॲमेझॉन वरून वेगवेगळे प्रॉडक्ट खरेदी करतात. तुम्ही Amazon वर फ्री मध्ये सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे प्रॉडक्ट ॲमेझॉनवर विकू शकता.
ॲमेझॉन वर तुम्ही जवळपास कोणतेही Products विकू शकता. जसे की कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, हेल्थ प्रॉडक्ट, ज्वेलरी, Electrical Appliances, बुक्स आणि अजूनही बरंच काही.
अमेझॉन चा एक मोठा Customer Base आहे आणि त्याचा तुम्हाला Directly फायदा होऊ शकतो.
19. ऑनलाइन हॉटेल ( Online Hotel )
आज-काल कोणाला काही खायचं असेल तर लोक घरबसल्या Zomato, Swiggy यांसारख्या App वरून ऑर्डर देतात. तुम्हाला जर काही चांगले पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही घर बसल्या या App वर स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं ऑनलाईन हॉटेल सुरु करू शकता.
या ठिकाणी Successful होण्यासाठी तुमच्या पदार्थांच्या Images अत्यंत आकर्षक असल्या पाहिजे कारण कोणताही व्यक्ती सर्वात आधी तुमच्या या पदार्थांच्या Images बघतो. या Images बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि त्याला तो पदार्थ खावासा वाटला पाहिजे.
20. वेबसाईट आणि ॲप डेव्हलपमेंट ( Website & App Development )
जग ऑनलाईन होत आहे. त्याचप्रमाणे बिझनेस देखील ऑनलाईन होत आहे. आज-काल प्रत्येकाला त्याच्या बिजनेस ची वेबसाईट बनवायचे आहे आणि ते अत्यंत गरजेचे आहे कारण तुमच्या बिजनेस ची वेबसाईट आहे की नाही यावरून लोक तुमच्या बिजनेस ची पात्रता ठरवतात.
तुम्ही घर बसल्या लोकांच्या वेबसाईट किंवा ॲप बनवून देऊ शकता आणि त्या माध्यमातून चांगले पैसे कमाऊ शकता.
Website आणि App कस बनवायचं हे तुम्ही YouTube आणि Google वरून सहज शिकू शकता.
21. यूट्यूब चॅनल ( Youtube Channel )
जगभरात 230 करोड पेक्षा अधिक लोक युट्युब चा वापर करतात. भारतात देखील करोडो लोक युट्युब चा वापर करतात. अनेक महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करून त्यातून अतिशय चांगले पैसे कमवत आहे. तुम्हाला जर एखादा टॉपिक मध्ये Interest असेल, ज्ञान असेल तर तुम्ही देखील तुमचे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू कर शकता.
तुम्हाला जर चेहरा दाखवायला Comfortable वाटत नसेल तर तुम्ही चेहरा न दाखवता देखील तुमचे Youtube Channel सुरू करू शकता.
युट्युब वरून तुम्ही Youtube Monetization, Affiliate Marketing, Spornsorship, स्वतःचे Products आणि Services विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता.
22. फ्रीलान्सिंग ( Freelancing )
कंपन्या Permenant Employees कामावर ठेवण्यापेक्षा Freelancer कडून काम करून घेणे पसंत करतात.
फ्रीलान्सर हे कोणत्याही कंपनीचे एम्प्लॉईज नसतात ते स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कंपन्यांची कामे घेतात आणि घरबसल्या त्यांची कामे करून देतात. प्रोजेक्ट नुसार किंवा तासा नुसार ते पैसे घेतात.
तुम्ही एक फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. आता प्रश्न हा येतो की तुम्हाला काम कुठे मिळेल तर तुम्ही Upwork.com, Fiverr.com यांसारख्या वेबसाइटवर तुमची प्रोफाईल रजिस्टर करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही अनेक वेगवेगळ्या Category मधील कामे करू शकता.
त्याच बरोबर तुम्हाला फेसबुकवर अनेक ग्रुप देखील भेटतील या ग्रुप वर देखील तुम्हाला कामे मिळतील.
काम मिळायला लागल्यावर तुम्ही हाताखाली इतर लोक देखील कामाला ठेवू शकता.
23. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस ( Digital Marketing Serivce )
कोणत्याही बिझनेसमध्ये Successful होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच जर काही असेल तर ते आहे मार्केटिंग आणि मार्केटिंग देखील आजकाल बदलत आहे.
हा डिजिटल मार्केटिंग चा जमाना आहे. लोकांना त्यांच्या व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करायचे आहे परंतु प्रत्येकाला ते करायला जमत नाही.
तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता
तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायांना आणि संस्थांना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस देऊ शकता. डिजिटल मार्केटिंग कशी करायची हे तुम्ही ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकता.
24. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer )
Social Media Influencer हे आजकाल खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्युब वर अनेक प्रसिद्ध इन्फ्ल्यून्सर चे व्हिडिओज बघत असाल.
तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओज अपलोड करू शकता. तुम्हाला जे टॉपिक मध्ये इंटरेस्ट असेल त्या टॉपिक वर तुम्ही व्हिडिओज बनवून ते वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड करू शकता.
इथं तुम्ही Advertising, Affiliate Marketing, Sponsorship तसेच स्वतःचे Products आणि Services विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता.
25. ड्रॉप शिपिंग ( Dropshipping )
ड्रॉप शिपिंग हा ई कॉमर्स चा एक प्रकार आहे. ड्रॉप शिपिंग मध्ये तुम्हाला फक्त प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून त्याची विक्री करायची असते.
प्रॉडक्ट विकण्यासाठी तुम्ही स्वतःची वेबसाइट बनवू शकता किंवा तुम्ही सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता. ज्यावेळेस तुमच्याकडं Customer ची ऑर्डर येते त्या वेळेस तुम्हाला ती ऑर्डर येते सप्लायर कडे पाठवायची असते आणि मग तो सप्लायर तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर कडे Ship करतो.
इथे तुम्हाला Product विकत घेण्याची चिंता नाही त्याचं Storage करण्याची चिंता नाही तसेच Shipping ची देखील चिंता नाही. तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्टच्या Images तुमच्या वेबसाईटवर किंवा इतर सोशल मीडियावर Upload करायचे आहे आणि त्या Products ची विक्री करायची आहे.
अनेक लोक ड्रॉप शिपिंग मधून महिन्याला करोडो रुपये देखील कमावत आहे.
26. प्रिंट ऑन डिमांड ( Print On Demand )
आजकाल लोकं वेगवेगळे प्रिंटेड कपडे वापरणे पसंद करतात. तुम्ही तुमच्या आसपास किंवा सोशल मीडियावर बघत असाल की लोकांच्या टी-शर्टवर वेगवेगळे शब्द लिहिलेल्या असतात, वेगवेगळ्या टॅगलाईन लिहिलेल्या असतात, वेगवेगळे डायलॉग लिहिलेले असतात. त्याचबरोबर आकर्षक असे चित्र आणि Design देखील त्यावर असतात.
तुम्ही प्रिंट ऑन डिमांड चा बिजनेस सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही टी-शर्टवर वेगवेगळ्या गोष्टी प्रिंट करून देण्याचा बिझनेस सुरू करू शकता.
यात तुम्ही होलसेल ने Plain टी-शर्ट विकत घेऊ शकता आणि त्यावर वेगवेगळ्या डिझाईन प्रिंट करून त्याची विक्री करू शकतात. तुम्ही हे टी-शर्ट ऑनलाईन देखिल विकू शकता.
27. ब्लॉगिंग ( Blogging )
Blogging ही एक अत्यंत प्रसिद्ध Online Business Idea आहे. अनेक लोक ब्लॉगिंगच्या माध्यमातून करोडो रुपये कमवत आहे.
ज्या वेळेस तुम्ही इंटरनेटवर कोणतीही माहिती सर्च करता त्यावेळेस तुमच्यासमोर अनेक वेबसाईट येतात. त्या वेबसाईट म्हणजेच Blog होय.
तुम्ही फ्री मध्ये देखील स्वतःचा Blog सुरू करू शकता. ब्लॉगिंग मधून तुम्ही Google Adsense, Affiliate Marketing, Sponsorship स्वतःचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता.
महिलांसाठी छोटे व्यवसाय ( Small Business Ideas For Housewives In Marathi )
28. गव्हाचे बिस्किट बनवणे ( Wheat Biscuit Making )
बिस्किट हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो बिस्कीट खायला प्रत्येकाला आवडतात परंतु मार्केटमधील जे काही बिस्कीट आहे त्यामध्ये मैदा असतो त्यामुळे अनेकांना पोटाचे त्रास होतात.
इथंच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. तुम्ही गव्हाचे बिस्किट बनवण्याचा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही घर बसल्या गव्हाचे बिस्किट कसे बनवायचे ते इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकता आणि गव्हाचे बिस्कीट बनवून देऊन त्याची विक्री करू शकता.
भविष्यात तुम्ही स्वतःचा ब्रँड देखील बनवू शकता.
29. फायनान्शिअल ॲडव्हायझर ( Financial Adviser )
तुम्हाला जर Finance मध्ये Interest असेल तर तुम्ही Financial Adviser देखील बनू शकता. त्यात तुम्ही Personal Finance, Money Management, Investment अशा अनेक सर्व्हिसेस लोकांना देऊ शकत.
फायनान्स सेक्टर मध्ये प्रचंड पैसा आहे. तुम्ही स्वतःचे YouTube Channel देखील सुरु करू शकता आणि त्या माध्यमातून देखील लोकांना Finance च Knowledge देऊ शकता.
30. टेलरिंग सर्विस ( Tailoring Services )
तुम्ही टेलरिंग बिझनेस सुरू करू शकता ज्यात तुम्ही महिलांचे ब्लाउज तसेच ड्रेस शिवण्याचे काम करू शकता. त्याच बरोबर कपडे फाटल्यावर देखील ते शिवण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील.
तुम्ही कपडे आणि ड्रेस फिटिंग चे काम देखील करू शकता.
31. महिलांची जिम ( Women’s Gym )
तुम्हाला जर फिटनेस मध्ये Interest असेल तर तुम्ही महिलांसाठी जिम सुरू करू शकता. आज-काल लोक फिटनेस बद्दल जागृत होत आहे आणि म्हणूनच फिटनेस इंडस्ट्रीमध्ये डिमांड देखील आहे.
मार्केटमध्ये अनेक जिम आहेत परंतु महिलांसाठी स्पेशल अशा जिम अतिशय कमी आहे किंवा जवळपास नाही म्हटलं तरी चालेल. तुम्ही या महिलांच्या स्पेशल कॅटेगरी ला टार्गेट करून तुमचा बिजनेस मोठा करू शकता.
तुम्ही ऑनलाईन देखील फिटनेस चे व्हिडिओ कोर्स बनवून ते विकू शकता, तुम्ही यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून देखील महिलांना फिटनेस ची ट्रेनिंग देऊ शकता.
अशाच नवनवीन Post मिळवण्यासाठी खाली तुमचा ‘Email’ Submit करा.
[email-subscribers-form id=”1″]