५५ घरगुती व्यवसायांची यादी 2024 [ कमी गुंतवणुकीत करा तुफान कमाई ] | 55 Home Business Ideas In Marathi 2024 [ Highly Profitable ]

जर तुम्हाला एखादा घरगुती व्यवसाय करायचा असेल परंतु घरगुती व्यवसाय कोणता करावा असा प्रश्न पडला असेल तर हि पोस्ट नक्की वाचा. 

या पोस्ट मध्ये मी ५५ घरगुती व्यवसायाची यादी दिलेली आहे. या यादीमध्ये मी या घरगुती व्यवसायांबद्दल ची काही महत्वाची माहिती देखील सांगितलेली आहे. 

तर चला सुरु करू या – 

५५ घरगुती व्यवसायांची यादी [ कमी गुंतवणूक, जास्त नफा ]

1. फ्रीलान्सर म्हणून काम करणे 

घरगुती व्यवसाय काय करावा असा प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असेल तर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता.

आजकाल मोठमोठ्या कंपन्या परमनंट एम्प्लॉईज ठेवण्याऐवजी फ्रीलान्सर कडून काम करून घेतात.

महिलांसाठी हा अत्यंत चांगला घरगुती व्यवसाय आहे यात तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या कंपन्यांची कामे करून देऊ शकता आणि तासानुसार किंवा प्रोजेक्ट नुसार पैसे चार्ज करू शकता.

२. सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस

आजकाल जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये सोशल मीडियाचा वापर केला जातो. व्यवसाय असो, राजकारण असो किंवा चित्रपट सृष्टी असो प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असतो.

अनेक व्यवसाय सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो कस्टमर मिळवतात. प्रसिद्ध लोक सोशल मीडियाचा वापर त्यांची फॅन फॉलोविंग वाढवण्यासाठी करतात तर राजकारणी त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर करतात. 

सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी टाईम द्यावा लागतो आणि प्रत्येकाकडेच एवढा टाईम नसतो आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

तुम्ही जर एक महिला असाल तर तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या लोकांचे सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात जसे की या लोकांच्या अकाउंटवर नियमितपणे पोस्ट करणे, कमेंटला रिप्लाय करणे, आणि जाहिरात करणे.

३. ब्युटी ब्लॉग सुरु करणे

आज काल लोक जवळपास सगळ्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करतात. जवळपास तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती इंटरनेटवर मिळते.

तुम्ही जर गुगलवर गेलात आणि काही सर्च केलं तर गुगल तुम्हाला खाली एक वेबसाईट ची लिस्ट दाखवते या वेबसाईट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ‘ब्लॉग’ असतात.

या ब्लॉग वर वेगवेगळे आर्टिकल्स लिहिलेले असतात जसे की – 

  • फॅशनच्या ब्लॉग वर फॅशन संदर्भातले आर्टिकल लिहिलेले असतात
  • फायनान्सच्या ब्लॉगवर फायनान्स संदर्भातले आर्टिकल लिहिलेले असतात
  • बिजनेस च्या ब्लॉगवर बिजनेस संदर्भातील आर्टिकल लिहिलेले असतात.

ब्लॉगिंग हा एक अतिशय चांगला घरगुती व्यवसाय आहे. 

तुम्ही दोन ते तीन हजारात स्वतःचा एक चांगला ब्लॉग सुरू करू शकता. तुमच्याकडे जर काहीच पैसे नसतील तर तुम्ही शून्य गुंतवणुकीत देखील स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता.

४. फिटनेस युट्युब चॅनल सुरु करणे

जर तुम्हाला फिटनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एखाद यूट्यूब चैनल सुरू करू शकता.  यावर तुम्ही फिटनेस या विषयावरील वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करू शकता.

हा एक अतिशय चांगला बिनभांडवली व्यवसाय आहे. इथं तुम्ही घरबसल्या काम करू शकता आणि यातून चांगले पैसे कमवू शकतात.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करू शकता जसे की चरबी कशी कमी करायची, पोट कस कमी करायचं, आणि आहार कोणता घ्यायचा.

तुम्ही या टॉपिक वरील इतर यूट्यूब चैनल फॉलो करू शकता.  त्यातून तुम्हाला अनेक नवनवीन आयडियाज मिळतील.

५. युटूबर्स ला व्हिडिओ एडिटिंग सर्विस देणे 

भारतामध्ये लाखो यूट्यूब चैनल आहे आणि हे लोक यूट्यूबच्या पैशातून त्यांच घर चालवतात. 

या यूट्यूब चैनल चे मालक सुरुवातीला स्वतः सर्व कामं करतात परंतु ज्या वेळेस त्यांच्याकडे थोडेसे पैसे यायला लागतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून ही कामे करून घेतात.

व्हिडिओ एडिटिंग हे एक महत्त्वाचे काम या क्षेत्रामध्ये केले जाते. व्हिडिओ एडिटिंग ची कामे घेणे हा एक अतिशय चांगला घरगुती व्यवसाय आहे.

व्हिडिओ कसा एडिट करायचा हे तुम्ही युट्युब वर फ्री मध्ये शिकू शकता आणि फ्री मधलेच ॲप वापरून तुम्ही हे व्हिडिओज एडिट करू शकता. 

एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्ही पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत पैसे चार्ज करू शकता.

६. इतरांच्या ब्लॉग साठी आर्टिकल लिहिणे

जगभरात शंभर करोड पेक्षाही जास्त ब्लॉग आहेत आणि असे अनेक ब्लॉग आहेत हे दर महिन्याला लाखो-करोडो रुपये कमावतात.

कोणताही व्यक्ती ज्या वेळेस ब्लॉक सुरू करतो त्यावेळेस तो सुरुवातीला स्वतः आर्टिकल लिहितो परंतु ज्या वेळेस त्याच्याकडे थोडेसे पैसे यायला लागतात त्यावेळेस तो इतर लोकांकडून आर्टिकल लिहून घेतो. 

जर तुम्हाला एखाद्या विषयाच चांगल ज्ञान असेल तर तुम्ही त्या विषयावर आर्टिकल्स लिहू शकता. तुम्ही या ब्लॉग च्या मालकांशी संपर्क साधून कामे मिळवू शकतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.  तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून आर्टिकल लिहू शकता आणि यातून चांगले पैसे कमावू शकता.

७. अमेझॉन वर महिलांचे प्रॉडक्ट विकणे 

अमेझॉन ही भारतातील सगळ्यात मोठी शॉपिंग वेबसाईट आहे.  करोडो महिला ॲमेझॉन वरून दररोज वेगवेगळे प्रॉडक्ट खरेदी करतात. 

या ठिकाणी महिलांचे अनेक प्रॉडक्ट विकले जातात जसे की कपडे, ज्वेलरी, फॅशन ॲक्सेसरीज, आणि  ब्युटी प्रॉडक्ट. 

तुम्ही अगदी फ्री मध्ये अमेझॉन वर एक विक्रेता म्हणून रजिस्टर होऊ शकता आणि वेगवेगळे प्रॉडक्ट अमेझॉन वरून संपूर्ण देशामध्ये विकू शकता.

तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये अनेक होलसेल सप्लायर सापडतील.  तुम्ही त्यांच्याकडून प्रॉडक्ट विकत घेऊन ते रिटेल दराने अमेझॉन वर विकू शकता.

आजकाल लोक सगळ्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करतात आणि म्हणूनच यातून तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळतील

८. घरगुती खानावळ सुरु करणे

कोणत्याही माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. मोठमोठ्या शहरांमध्ये लोक दुसऱ्या गावांवरून येतात.

काही लोक नोकरीसाठी येतात तर काही लोक शिक्षणासाठी येतात तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी येतात. या लोकांना मेसची किंवा खानावळीची नेहमी गरज भासत असते.

तुम्हाला जर चांगले जेवण बनवता येत असेल तर तुम्ही एक घरगुती खानावळ सुरू करू शकता .खानावळीच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला अगदी सहज लाखो रुपये देखील कमवू शकता.

९. डिजिटल मार्केटिंग सर्विस देणे

जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्केटिंग आणि जाहिरातींचा उपयोग केला जातो.

पूर्वीच्या काळी ऑफलाइन मार्केटिंग केली जायची ज्यात न्युज पेपर, पॅम्प्लेट,  टीव्ही , आणि होल्डिंग अशा माध्यमांचा वापर केला जायचा परंतु आजकाल जग हे डिजिटल होत आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण त्याच्या व्यवसायाची ऑनलाइन मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे

डिजिटल माध्यमांवर मार्केटिंग किंवा जाहिरात करणे यासाठी तुमच्याकडे काही Skills असण्याची आवश्यकता असते आणि प्रत्येकालाच हे काम करता येत नाही. 

डिजिटल मार्केटिंग कशी करायची ते व्यवस्थित शिकल्यानंतर तुम्ही इतरांना डिजिटल मार्केटिंग ची सर्विस देऊ शकता आणि त्यातून अतिशय चांगले पैसे तुम्ही कमावू शकता. हा एक अतिशय चांगला घरगुती व्यवसाय आहे.

१०. घरबसल्या वेबसाईट बनवणे

आजकाल प्रत्येक जण त्याच्या बिजनेस ची वेबसाईट बनवायची असते आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

वेबसाईट कशी बनवायची ते तुम्ही युट्युब वर फ्री मध्ये शिकू शकता आणि हा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातूनच सुरु करू शकता.

काही सेकंडहँड कॉम्पुटर विकत घेऊन हा व्यवसाय तुम्ही करू शकता. 

११. घरबसल्या App बनवणे

तुम्हाला जर प्रोग्रामिंग किंवा कोडींग येत असेल तर तुम्ही घरबसल्या ॲप बनवू शकता.

तुम्ही इतरांना ॲप बनवून देऊ शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं ॲप देखील बनवू शकता आणि त्या माध्यमातून अतिशय चांगले पैसे तुम्ही इथे कमवू शकता.

जवळपास प्रत्येक व्यवसायाला आणि कंपनीला स्वतःच एक ॲप असावं असं वाटतं आणि इथेच तुमच्यासाठी एक संधी निर्माण होते.

तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता यासाठी तुम्हाला फक्त एखाद्या कॉम्प्युटरची आवश्यकता भासेल जे तुम्ही सेकंड हॅन्ड देखील घेऊ शकता.

जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी भन्नाटआयडिया असेल तर तुम्ही एखादा स्वतःचं ॲप बनवू शकता आणि ते प्ले स्टोअर वर ऍड करू शकता. ऍडव्हर्टायझिंग तसेच स्पॉन्सरशिप अशा अनेक माध्यमातून तुम्ही इथे पैसे कमवू शकता.

१२. Social Media Influencer बनणे

तुम्ही इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडिओज बघत असाल जसे की युट्युब व्हिडिओज तसेच इंस्टाग्राम रिल्स. 

त्याचबरोबर इतरही अनेक शॉर्ट व्हिडिओचे ॲप मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे. या ॲपवर तुम्ही अनेक लोक बघितले असतील – काही लोक वेगवेगळे डान्स चे व्हिडिओज बनवतात, काही लोक म्युझिकचे व्हिडिओज बनवतात तर काही लोक कॉमेडी व्हिडिओज बनवतात.

त्याचबरोबर अनेक लोक एज्युकेशनल व्हिडिओज देखील बनवतात.

याच लोकांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असं म्हटलं जातं.  तुमच्या अंगात जर एखादा स्किल असेल किंवा जर एखाद्या विषयाचे तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनवू शकता.

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही दुकान वगैरे सुरू करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्येच, तुमच्या स्मार्टफोनवरून हा व्यवसाय करू शकता.

इथं पैसे कमवण्याचे देखील अनेक मार्ग उपलब्ध आहेत जसे की जाहिरात करणे, स्पॉन्सरशिप तसेच वेगवेगळ्या प्रॉडक्ट आणि सर्विसेसची विक्री करणे.

असे अनेक लोक आहेत जे दर महिन्याला एक ते पाच लाख रुपयांपर्यंत पैसे कमावतात.

१३. घरगुती ट्यूशन सुरु करणे

अनेक शहरांमध्ये लोक ट्युशन क्लासेस च्या माध्यमातून करोडो रुपये कमवतात. प्रत्येक शहरांमध्ये कमीत कमी दोन ते तीन शाळा आणि दोन ते तीन कॉलेजेस असतात.

तुम्ही पहिले ते चौथीचे क्लासेस घेऊ शकता किंवा पाचवी ते दहावीचे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही अकरावी बारावीची देखील क्लासेस घेऊ शकता.

इथं तुम्ही मल्टिपल विषयांचे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या ठराविक विषयाचे क्लासेस देखील घेऊ शकता 

गणित, विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, इंग्लिश, इतिहास आणि भूगोल असे अनेक विषय तुम्ही इथं शिकवू शकता.

सुरुवातीला तुम्ही घरगुती ट्युशन क्लासेस सुरू करू शकता. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही एखादा गाळा घेऊन तुमचे क्लासेस बाहेर शिफ्ट करू शकता.

१४. ऑनलाईन कोर्स विकणे

तुम्हाला जर एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर तुम्ही त्या टॉपिक वर व्हिडिओ कोर्सेस बनवू शकता आणि ते कोर्सेस ऑनलाइन जाहिरात करून विकू शकता.

तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही अशा अनेक कोर्सच्या जाहिराती बघितल्या असतील.

मार्केटिंग, फायनान्स, फिटनेस, ऍक्टिंग, डान्स, पब्लिक स्पिकिंग, टाईम मॅनेजमेंट, आणि कम्युनिकेशन अशा अगदी कोणत्याही विषयावर तुम्ही कोर्सेस बनवू शकता.

तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून हे कोर्सेस रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.

१५. घरगुती योगा क्लासेस

घरगुती योगा क्लासेस सुरू करणे हि देखील एक अतिशय चांगली घरगुती व्यवसाय कल्पना आहे. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी देखील उत्कृष्ट आहे.

आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांची लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपल्याला अनेक वेगवेगळ्या हेल्थ प्रॉब्लेम चा सामना करावा लागतो आणि या प्रॉब्लेमच सर्वात चांगलं सोल्युशन म्हणजे योगा आहे.

योगा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड वेगाने वाढत आहे परंतु योगासन कसे करायचे हे लोकांना माहित नाही आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्ही तुमच्या घरातच पुढच्या हॉलमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या रूममध्ये किंवा घरासमोरच्या पटांगणात तुमचे हे योगा क्लासेस तुम्ही सुरू करू शकता.

या योगा क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही तीस हजार ते एक लाख रुपये महिना अगदी आरामात कमवू शकता.

१६. डान्स क्लासेस 

तुम्हाला जर डान्स करता येत असेल तर तुम्ही घरगुती डान्स क्लासेस सुरू करू शकता. मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक अशा डान्स क्लासेस ला जॉईन होतात. 

आजकाल लोक व्यायाम म्हणून देखील डान्स क्लास जॉईन करतात. डान्स चे अनेक वेगवेगळे प्रकार आहे तुम्हाला जो प्रकार येत असेल त्या प्रकारचा डान्स तुम्ही या लोकांना शिकवू शकता.

तुम्ही मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांचे देखील डान्स क्लासेस सुरू करू शकता.  डान्स क्लासेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या घरातच या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

१७. संगीत क्लासेस 

तुम्हाला जर काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवता येत असतील तर तुम्ही म्युझिक क्लासेस देखील तुमच्या भागामध्ये सुरू करू शकता.

गिटार, तबला, ढोल, पियानो, किंवा बँड अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना शिकवू शकता.

तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकवत बसण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वाजवण्यात एक्सपर्ट असाल फक्त तेच इन्स्ट्रुमेंट लोकांना शिकवू शकता. 

त्याच बरोबर तुम्हाला जर सिंगिंग येत असेल तर तुम्ही लोकांना सिंगिंग देखील शिकवू शकता आणि त्या माध्यमातून देखील चांगले पैसे कमवू शकता.

१८. Acting क्लासेस

एक्टिंग क्लासेस सुरू करणे हा देखील एक अतिशय चांगला घरगुती व्यवसाय आहे जो तुम्ही करू शकता.

आजकाल अनेक लोक ऍक्टिंग किंवा मॉडेलिंग मध्ये त्यांच करिअर करण्यास इच्छुक असतात आणि म्हणूनच हे लोक ऍक्टिंग क्लासेस जॉईन करतात. 

तुम्हाला जर चांगली एक्टिंग करता येत असेल किंवा शिकवता येत असेल तर तुम्ही तुमच्या घरातच एक्टिंग क्लासेस ची सुरुवात करू शकता.

तुम्ही मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांना देखील एक्टिंग शिकवण्याचे क्लासेस सुरू करू शकता.

इथं तुम्ही दिवसातील काही तास जरी काम केले तरी तुम्ही यातून चांगले पैसे कमावू शकता.

१९. कूकिंग क्लासेस

कुकिंग हे एक जीवनावश्यक स्किल आहे. पूर्वीच्या काळी हे स्किल फक्त महिलांकडे असायचे परंतु आजकाल जमाना पाहिल्यासारखा राहिला नाही. 

आजकाल महिलांबरोबरच पुरुषांना देखील कुकिंग करता येणे आजकाल गरजेचे झालेले आहे. परंतु आजकाल पुरुषांना तर सोडाच परंतु महिलांना देखील कुकिंग जमत नाही.

तुम्हाला जर चांगली कुकिंग करता येत असेल किंवा जर काही ठराविक पदार्थ तुम्हाला चांगले बनवता येत असतील तर तुम्ही अशा प्रकारचा एक घरगुती व्यवसाय सुरू करू शकता.

तुम्ही जनरल कुकिंग देखील शिकवू शकता किंवा काही ठराविक पदार्थ कसे बनवायचे त्याचे स्पेशल क्लासेस घेऊ शकता.

२०. मेहंदी आणि रांगोळी चे क्लासेस

मेहंदी व रांगोळी काढणे हे महिलांना खूप आवडते परंतु सगळ्याच महिलांना हे जमत नाही.

तुम्हाला जर चांगली मेहंदी किंवा रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही याचे घरगुती क्लासेस तुमच्या भागामध्ये सुरू करू शकता. 

या व्यवसायात तुम्हाला दिवसभर काम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दिवसातले काही तास जरी काम केले तरी यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

२१. पुस्तक सेल्फ पब्लिश करणे 

तुम्हाला जर एखाद्या विषयच ज्ञान असेल तर तुम्ही पुस्तक लिहू शकता. मार्केटिंग, फायनान्स, लाइफस्टाइल, किंवा कूकिंग अशा कोणत्याही विषयावर तुम्ही पुस्तक लिहू शकता. 

आजकाल पुस्तक पब्लिश करणं देखील अतिशय सोपं झालेलं आहे. तुम्ही ऍमेझॉन किंडल वर फ्री मध्ये तुमचं पुस्तक सेल्फ पब्लिश करू शकता. 

२२. घरगुती साड्या विकणे 

कपड्याचे दुकान सुरू करण्यासाठी कमीत कमी तीन ते चार लाख रुपयांची इन्वेस्टमेंट करावी लागते परंतु जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्हाला हा व्यवसाय करता येणार नाही अस अजिबात नाही.

तुम्ही जर एक महिला असाल आणि जर तुम्हाला एक घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 30 ते 40 हजारात देखील घरगुती साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

तुमच्या भागात लोकांची खरेदी करण्याची जशी क्षमता असेल त्यानुसार तुम्ही स्वस्थ किंवा महाग साड्या विक्रीसाठी ठेवू शकता. 

तुम्ही सुरत वरून होलसेल ने साड्या विकत घेऊ शकता आणि त्या तुमच्या शहरांमध्ये विकू शकता. सुरत मध्ये अगदी शंभर रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत होलसेल किमतीच्या साड्या तुम्हाला मिळतील.

२३. महिलांचे दागिने विकणे

तुम्ही घर बसल्या महिलांची आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. भारतातील महिलांना दागिने प्रचंड आवडतात परंतु आजकाल सोन्या चांदीचे दागिने वापरणे हे परवडत नाही.

आर्टिफिशल ज्वेलरी ही दिसायला अगदी सोन्या-चांदीच्या दागिन्यासारखीच असते परंतु अगदी स्वस्त दरात ती मिळते.

तुम्हाला तुमच्या आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये अनेक होलसेल सप्लायर सापडतील. त्यांच्याकडून तुम्ही ही आर्टिफिशियल ज्वेलरी अगदी स्वस्तात खरेदी करू शकता आणि मग प्रॉफिट मार्जिन ऍड करून ते तुम्ही तुमच्या भागातील महिलांना विकू शकता

२४. लोणचे आणि पापड बनवणे

महिलांसाठी एक अतिशय प्रसिद्ध आणि पारंपारिक घरगुती व्यवसाय म्हणजे लोणचे आणि पापड बनवणे. तुम्ही जर एक महिला असाल आणि जर तुम्हाला चांगलं लोणचं आणि पापड बनवता येत असतील तर तुम्ही हा देखील व्यवसाय करू शकता.

यात तुम्ही अजून एक काम करू शकता ते म्हणजे तुम्ही तुमचा एक ब्रँड बनवू शकता. तुमच्या लोणच्याला आणि पापडांना जर चांगली चव असेल तर तुम्ही हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता आणि यातून तुम्ही लाखो रुपये देखील कमावू शकता.

जाहिरात करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता.

२५. शेवया, पापड्या, आणि कुरडया बनवणे

पूर्वीच्या काळी गावातील महिलांना शेवया, पापड्या आणि कुरडया बनवता यायच्या परंतु आजकाल तसे राहिलेले नाही.

आजकाल महिलांना या गोष्टी बनवता येत नाही आणि इथेच तुमच्यासाठी खूप मोठी संधी निर्माण होते.

तुम्हाला जर शेवया, पापड्या किंवा कुरडया बनवता येत असतील तर तुम्ही तुमच्या शहरातील लोकांना या गोष्टी बनवून देऊ शकता.

हे एक अतिशय सोपे घरगुती काम आहे जे तुम्ही करू शकता आणि त्यातून अतिशय चांगले पैसे कमवू शकता.

शहरांमधील लोकांकडे बऱ्यापैकी पैसा असतो आणि म्हणूनच लोक या गोष्टी रेडीमेड घेणेच पसंत करतात आणि त्यासाठी चांगले पैसे मोजायला देखील ते तयार असतात.

२६. मसाले बनवणे 

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. जवळपास कोणताही खाद्यपदार्थ असो त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना मसाला वापरला जातो.

तुम्हाला जर चांगला मसाला बनवता येत असेल तर तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लोकांना बनवून देऊ शकता.

सुरुवातीला तुम्ही तुमच्या आसपासच्या भागातील लोकांना फ्री मध्ये तुमचा मसाला टेस्ट करण्यासाठी देऊ शकता आणि जर त्यांना तुमच्या मसाल्याची टेस्ट आवडली तर मग ते तुम्हाला मोठी ऑर्डर देखील देतील.

या व्यवसायात तुम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही तुमचा एक मसाल्याचा ब्रँड बनवू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक चांगलं नाव देऊ शकता तसेच एखादा लोगो तुम्ही बनवून घेऊ शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानाची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरातूनच या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

२७. सॅलड बनवणे आणि विकणे

मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक लोक सलाड च्या व्यवसायातून अतिशय चांगले पैसे कमवत आहे. फ्रुट सलाड हे शरीरासाठी अतिशय हेल्दी मानला जातो आणि म्हणूनच अनेक लोक आवडीने सलाड खाणे पसंत करतात. 

तुम्ही तुमच्या घरातूनच वेगवेगळ्या फळांचं आणि भाज्यांचं सलाड बनवू शकता आणि ते लोकांना घरपोच डिलिव्हर करू शकता.

तुम्हाला शहरांमध्ये भरपूर ऑर्डर मिळतील आणि यातून तुम्ही दर महिन्याला 50 हजार ते एक लाख रुपये आरामात कमवू शकता.

२८. Alternative मेडिसिन सर्विस

आजकाल आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की ज्यामुळे आपल्याला अनेक हेल्थ प्रॉब्लेम चा सामना करावा लागत आहे जसे की पाठ दुखी, कंबर दुखी, डोकेदुखी, पोट दुखी.

अनेक वेळेस दवाखान्यात जाऊन देखील काहीच उपयोग होत नाही आणि अशा वेळेस अल्टरनेटिव्ह मेडिसिन उपयोगी ठरत आहे.

ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मॅग्नेट थेरपी, सुजोक अशा अनेक प्रकारच्या अल्टरनेटिव्ह थेरपीज मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे.

तुम्ही अल्टरनेटिव्ह थेरपीचा एखादा कोर्स करू शकता आणि तुमच्या घरातूनच या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

२९. शिवणकाम करणे

तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर हा देखील एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे. तुम्ही महिलांचे ब्लाऊज किंवा ड्रेस शिवून देण्याचे काम करू शकता.

त्याचबरोबर फाटलेले कपडे शिवणे, बटन लावणे, चैन फिट करून देणे, उशांचे कव्हर शिवणे अशा प्रकारचे अनेक काम तुम्ही करू शकता.

तुम्हाला जर शिवणकाम जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन Free मध्ये देखील ते शिकू शकता किंवा एखादा छोटासा कोर्स देखील तुम्ही करू शकता.

३०. ड्रॉप शिपिंग स्टोअर सुरु करणे

ड्रॉप शिपिंग हा एक अतिशय प्रसिद्ध घरगुती व्यवसाय आहे आणि यातून तुम्ही दर महिन्याला अगदी करोडो रुपये देखील कमावू शकता.

ड्रॉप शिपिंग च्या व्यवसायात तुम्हाला ऑनलाईन वेगवेगळे प्रॉडक्ट विकायचे असतात.

इथे तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्टच्या इमेजेस आणी त्याची महिती तुमच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडियावर अपलोड करायची असते आणि ज्या वेळेस कोणताही कष्टमर त्या प्रॉडक्ट ची ऑर्डर देतो त्यावेळेस ती ऑर्डर तुम्हाला तुमच्या ड्रॉप शिपिंग सप्लायर कडे पाठवायची असते.

मग ड्रॉप शिपिंग सप्लायर तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमरच्या दारापर्यंत शीप करतो. 

इथे तुम्हाला होलसेल ने प्रॉडक्ट विकत घेणे, स्टोरेज, शिपिंग अशा कोणत्या गोष्टीची चिंता करावी लागत नाही. ही सगळी कामे तो ड्रॉप शिपिंग सप्लायर करतो. तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्टची विक्री करायची असते.

ड्रॉप शिपिंग सप्लायरला फक्त होलसेल प्राईज च पेमेंट तुम्हाला करायचं असतं बाकीचं सगळं प्रॉफिट मार्जिन हे तुमचं असतं.

३१. घरगुती ब्युटी पार्लर

ब्युटी पार्लर ची सर्विस ही लेडीज साठी एक आवश्यक सर्विस आहे.

तुम्ही एखादा ब्युटी पार्लरचा छोटासा कोर्स करू शकता आणि तुमच्या घरातच एक छोटं ब्युटी पार्लर सुरू करू शकता.

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.

तुम्हाला तुमच्या आसपासच्या भागातील कस्टमर जरी मिळाली तरी देखील तुम्ही यातून अतिशय चांगले पैसे दर महिन्याला कमवू शकता.

३२. केक बनवणे

भारतामध्ये वेगवेगळ्या इव्हेंट्स सेलिब्रेट केला जातात आणि जवळपास प्रत्येक सेलिब्रेशन मध्ये केकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

तुम्ही केक बनवण्याचा एखादा छोटासा कोर्स करू शकता आणि तुमच्या घरातूनच केक बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

तुम्ही एखादं युट्युब चॅनेल देखील सुरू करू शकता ज्यावर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या केकचे व्हिडिओज अपलोड करून त्यातून देखील चांगले पैसे कमवू शकतात.

३३. घरगुती बेकरी सुरु करणे

बेकरी प्रॉडक्ट ची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. जवळपास प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ले जातात आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्हाला जर वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स बनवता येत असतील तर तुम्ही एखादी घरगुती बेकरी देखील सुरू करू शकता.

जर तुमच्याकडे हे स्किल नसेल तर तुम्ही ऑनलाईन फ्री मध्ये देखील या गोष्टी शिकू शकता किंवा एखादा छोटासा कोर्स करू शकता.

बेकरी प्रॉडक्ट मध्ये नाविन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर न करता बेकरी प्रॉडक्ट्स बनवू शकता आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी देखील या गोष्टीचा उपयोग करू शकता.

३४. तूप आणि दही बनवण्याचा व्यवसाय

घरगुती तूप आणि दही बनवण्याचा व्यवसाय देखील एक उत्तम व्यवसाय आहे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तूप आणि दही खाल्लं जातं. जर तुमच्याकडे गाया असतील आणि जर तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असाल तर सोबतच तुम्ही तूप आणि दही बनवण्याचा व्यवसाय देखील करू शकता.

तुम्ही भविष्यात तुमचा एखादा डेअरी ब्रँड देखिल बनवू शकता.

३५. घरगुती Laundry आणि Dry Cleaning सर्विस देणे

लॉन्ड्री आणि ड्राय क्लीनिंग ची सर्विस देणे हा देखील एक अतिशय सोपा घरगुती व्यवसाय तुम्ही करू शकता.

जवळपास प्रत्येक भागामध्ये अशा सर्विस ची आवश्यकता असते. तुमच्या भागामध्ये जवळपास जर अशी काही दुकानं नसतील तर तुम्ही निश्चितच या व्यवसायाबद्दल विचार करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी गुंतवणूक वगैरे करण्याची आवश्यकता नाही आणि हे काम कसं करायचं ते देखील तुम्ही युट्युब वरून फ्री मध्ये शिकू शकता.

३६. लहान मुलं सांभाळण्याचा व्यवसाय

अनेक महिला लहान मुले सांभाळण्याचा व्यवसाय करून अतिशय चांगले पैसे कमवत आहे.

मोठमोठ्या शहरांमध्ये महिला आणि पुरुष दोघेही जॉब निमित्त किंवा कामानिमित्त घराबाहेर जातात आणि अशा वेळेस त्यांच्या लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि इथेच तुमच्यासाठी एक संधी निर्माण होते.

तुम्ही तुमच्या घरातूनच या व्यवसायाची सुरुवात करू शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही थोडीफार खेळणी देखील विकत घेऊ शकता. 

३७. मशरूम चा व्यवसाय

तुमच्याकडे जर थोडीशी जागा असेल तर तुम्ही मशरूम कल्टिवेशन चा व्यवसाय देखील सुरू करू शकता.

शहरांमध्ये अनेक लोक मशरूम खातात आणि याची मार्केटमध्ये अतिशय चांगली डिमांड आहे.

त्याचबरोबर हॉटेलमध्ये तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील मशरूम चे पदार्थ बनवले जातात आणि म्हणूनच तुम्हाला भरपूर ऑर्डर्स देखील इथे मिळतील.

तुम्ही मशरूम कल्टिवेशन चा एखादा छोटासा कोर्स देखील करू शकता. अनेक लोक याची ट्रेनिंग देतात. 

३८. किराणा आणि भाज्या विकणे

किराणा सामान आणि भाज्यांची आवश्यकता जवळपास प्रत्येक भागामध्ये असते.

अनेक असे भाग तुम्हाला सापडतील जिथ जवळपास जास्त किराणा दुकानं नाहीत किंवा भाजी विक्रेते देखील नाही.

तुम्ही तुमच्या घरामधूनच रोजच्या वापरातील किराणा सामान विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता तसेच तुम्ही तुमच्या भागात विकल्या जाणाऱ्या भाज्या देखील विक्रीसाठी ठेवू शकता.

तुम्हाला जर ग्रामीण भागात व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही किराणा दुकान या व्यवसायाचा नक्कीच विचार करू शकता. 

३९. अकाउंटिंग ची कामे करणे

तुम्हाला जर अकाउंटिंग येत असेल तर हा देखील एक अतिशय चांगला घरगुती व्यवसाय आहे.

प्रत्येक शहरामध्ये हजारो वेगवेगळी दुकाने असतात आणि जवळपास प्रत्येक दुकानाला अकाउंटिंग सर्विस ची आवश्यकता असते. 

तुम्हाला जर Tally सारखी सॉफ्टवेअर वापरता येत असतील आणि जर अकाउंटिंग ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या शहरातील दुकानदारांना आणि व्यवसायांना अकाउंटिंग ची सर्विस देऊ शकता.

४०. मिठाई बनवून विकण्याचा व्यवसाय

भारतामध्ये लोकांना मिठाई अतिशय आवडते. वेगवेगळ्या कार्यक्रमाला आणि सणांना मोठ्या प्रमाणावर मिठाई बनवली जाते.

त्याचबरोबर असे देखील अनेक लोक आहे ज्यांना अधून मधून मिठाई खाण्याची सवय असते आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवता येत असतील तर तुम्ही तुमच्या घरातूनच मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

तुम्ही इथं वेगवेगळ्या पारंपारिक घरगुती मिठाई देखील बनवून त्यांची विक्री करू शकता.

४१. खाद्यपदार्थ बनवण्याच्या ऑर्डर घेणे

तुम्हाला जर काही खाद्यपदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही ते खाद्यपदार्थ बनवण्याच्या ऑर्डर घेऊ शकता.

अनेक अशा महिला असतात ज्यांना काही ठराविक असे खाद्यपदार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने बनवता येतात जसे की पुरणाच्या पोळ्या, ढोकळा, समोसे कचोरी, किंवा दाळ बट्टी

तुम्ही तुमच्या घरातूनच अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि ऑर्डर नुसार लोकांना वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकता.

४२. ग्राफिक डिझाईन सर्व्हिस

जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राफिक डिझाईनचा वापर केला जातो. 

तुम्ही ग्राफिक डिझाईनचा एखादा छोटासा कोर्स करू शकता आणि ही सर्विस तुम्ही लोकांना देऊ शकता.

तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी बनवू शकता जसे की पॅम्फ्लेट, फ्लायर्स, बॅनर्स, बिजनेस कार्ड, होल्डिंग, सोशल मीडिया पोस्ट आणि अजूनही बरंच काही.

४३. इव्हेंट प्लॅनर बना

अजून एक घरगुती सोपा व्यवसाय म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग करणे. भारतामध्ये शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट होत असतात आणि या इव्हेंटची प्लॅनिंग करणे हे एक मोठं काम असतं.

तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट प्लॅनिंग करण्याचे काम करू शकता आणि त्यासाठी काही ठराविक पैसे चार्ज करू शकता.

इव्हेंट प्लॅनिंग बरोबरच तुम्ही लोकांना हॉल, मंडप तसेच केटरिंग सर्विस Recommend करू शकता आणि त्या बदल्यात त्या सर्विस प्रोव्हायडर कडून तुम्ही काही पैसे चार्ज करू शकता. 

४४. वेडिंग प्लॅनर बना

भारतामध्ये लग्न ही एका अतिशय मोठी इव्हेंट असते आणि या लग्नांमध्ये लाखो रुपये खर्च केले जातात.

भारतीय लग्नामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आणि छोट्या मोठ्या इव्हेंट केल्या जातात आणि या सगळ्यांची व्यवस्थितपणे प्लॅनिंग करण अत्यंत गरजेचं असतं.

तुम्ही घरबसल्या लोकांना वेडिंग प्लॅनिंग ची सर्विस देऊ शकता. ही सर्विस तुम्ही फोन कॉल वरून किंवा व्हाट्सअप वरून ऑनलाइन देखील देऊ शकता.

इथे देखील तुम्ही वेगवेगळ्या सर्विस प्रोव्हायडर ला recommend करून चांगले पैसे कमवू शकता.

४५. Financial Consultant बनू शकता

तुम्हाला जर फायनान्सचं नॉलेज असेल तर तुम्ही फायनान्शिअल कन्सल्टंट बनू शकता.

फायनान्सचं नॉलेज असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं परंतु दुर्दैवाने त्याबद्दल कोणीच बोलत नाही.

पैसे कमवण्यासाठी लोक जॉब किंवा बिजनेस करतात आणि चांगले पैसे देखील कमवतात परंतु ते कमवलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे किंवा कुठे ठेवायचे हे मात्र त्यांना समजत नाही आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्ही लोकांना यामध्ये मदत करून त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

४६. वधू वर सूचक मंडळ

तुम्ही एक घरगुती वधू-वर सूचक मंडळ सुरू करू शकतात. 

भारतामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि अनेक तरुण-तरुणी असे आहेत जे बिन लग्नाचे आहेत आणि इथेच तुमच्यासाठी एक चांगली संधी निर्माण होते.

तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि यातून चांगले पैसे कमवू शकता.

४७. ट्रॅव्हल एजन्ट बनू शकता

आजकाल लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं. भारतामध्ये असे अनेक ठिकाण आहे जिथे लाखो लोक दरवर्षी भेट देतात.

टुरिझम करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती असणं गरजेचं असतं. 

तुम्ही घरबसल्या एक ट्रॅव्हल एजंट बनू शकता. इथं तुम्ही लोकांना त्यांच्या Tour मधील सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करू शकता.

तुम्ही काही नावाजलेल्या ट्रॅव्हल कंपन्यांसोबत देखील काम करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

४८. ऑनलाईन हॉटेल सुरु करा

तुम्हाला जर काही चांगले पदार्थ बनावता येत असतील तर तुम्ही घरबसल्या तुमचं ऑनलाईन हॉटेल सुरु करू शकता. 

Zomato आणि swiggy अशा फूड डिलिव्हरी अँप वरून तुम्ही तुमच्या पदार्थांची विक्री करू शकता. 

तुमच्या शहरात नेमके कोणते पदार्थ विकले जातात याची तुम्ही थोडीशी माहिती काढू शकता. या अँप वर देखील तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

४९. फेसबुक जाहिरात सर्विस देणे

भारतामध्ये करोडो लोक फेसबुक आणि इंस्टाग्राम चा वापर करतात आणि म्हणूनच अनेक व्यवसायिक या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी इच्छुक असतात.

फेसबुक वर जाहिरात करण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टीचे ज्ञान असणे गरजेचे आहे आणि प्रत्येकाकडे ते ज्ञान नसते आणि इथेच तुमच्यासाठी एक व्यावसायिक संधी निर्माण होते.

फेसबुक वर जाहिरात कशी करायची ते तुम्ही युट्युब वरून फ्री मध्ये शिकू शकता आणि तुमच्या भागातील दुकानदारांना तसेच व्यवसायिकांना ही सर्विस देऊन त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

५०. झुंबा क्लासेस सुरु करा

डान्स क्लासेस प्रमाणेच झुंबा क्लासेस ची देखील मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. तुम्ही एखादा झुंबाचा कोर्स करू शकता आणि तुमच्या भागामध्ये घरातूनच स्वतःचे झुंबा क्लासेस सुरू करू शकतात.

शहरांमध्ये अनेक महिला मोठ्या संख्येने अशा प्रकारच्या क्लासेसला जॉईन होतात. अनेक महिला व्यायाम म्हणून देखील हा क्लास जॉईन करतात.

तुम्हाला शहरांमध्ये भरपूर कस्टमर मिळतील आणि या व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे देखील कमावू शकता.

५१. Sell Products On Facebook

अमेझॉन प्रमाणेच तुम्ही फेसबुक वर देखील वेगवेगळे प्रॉडक्ट विकू शकता.

भारतात करोडो लोक फेसबुकचा वापर करतात. तुम्ही फेसबुक वर जाहिरात करून तुमच्या प्रॉडक्टची विक्री करू शकता. 

तुम्ही तुमच्या भागातील काही चांगले होलसेल सप्लायर शोधून काढू शकता आणि त्यांचे प्रॉडक्ट रिटेल दराने फेसबुकच्या माध्यमातून विकू शकता.

५२. Computer Training देणे

आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जातो. गव्हर्मेंट जॉब असो किंवा खाजगी जॉब्स तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येणे अत्यंत गरजेचं असतं.

तुम्ही तुमच्या घरातूनच एक छोटं कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकता. त्यासाठी तुम्ही हव तर एक ते दोन सेकंड हॅन्ड कॉम्प्युटर विकत घेऊ शकता.

अनेक वेगवेगळे कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कोर्सेस तुम्ही लोकांना देऊ शकता.

५३. Develop A Software

तुम्हाला जर कोडींग किंवा प्रोग्रामिंग जमत असेल तर तुम्ही एखादं उपयोगी असं सॉफ्टवेअर Develop करू शकता.

आजकाल जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअरचा वापर केला जातो आणि जर तुमच्या सॉफ्टवेअरने खरंच त्या क्षेत्रातील प्रॉब्लेम सोडवला तर तुम्ही या व्यवसायातून करोडो रुपये देखील कमावू शकता.

५४. Affiliate Marketing करू शकता

तुम्ही घर बसल्या affiliate marketing करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

Affiliate marketing मध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते. ती लिंक तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडियावर शेअर करायची असते आणि त्यावर क्लिक करून जर कोणी तो प्रॉडक्ट किंवा सर्विस खरेदी केली तर त्याचं तुम्हाला काही कमिशन मिळत.

अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहे ज्यांचा अशा प्रकारचा affiliate program आहे जो तुम्ही जॉईन करू शकता.

५५. घरगुती होलसेल व्यवसाय

अनेक घरगुती होलसेल व्यवसाय आहे जे तुम्ही करू शकता. मार्केट मध्ये अनेक अशे प्रॉडक्ट आहे जे bulk मध्ये घेतले तर स्वस्तात मिळतात आणि पॅकिंग मध्ये महाग. 

तुम्ही bulk मध्ये हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता आणि त्यांची तुमच्या कंपनी च्या नावाने पॅकिंग करून अतिशय चांगले पैसे कमावू शकता. हा एक अतिशय चांगला घरगुती पॅकिंग व्यवसाय देखील आहे. 

Conclusion –

मला खात्री आहे हे घरगुती व्यवसाय तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

अशाच नवनवीन बिजनेस आयडिया नियमितपणे मिळवण्यासाठी खाली तुमचा ईमेल आयडी सबमिट करा.

[email-subscribers-form id=”1″]

हे देखील वाचा

FAQ

1. घरगुती व्यवसाय म्हणजे काय?

जो व्यवसाय करण्यासाठी कुठं बाहेर जाण्याची गरज नाही आणि घरातूनच तो केला जाऊ शकतो अशा व्यवसायाला घरगुती व्यवसाय म्हणतात. ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

2. आजकाल घरगुती व्यवसाय लोकप्रिय का आहे?

लॉकडाऊन च्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच अनेक ऑफलाईन व्यवसाय बंद पडले परंतु जे लोक घरगुती व्यवसाय करत होते ते या संकटात वाचले आणि म्हणूनच घरगुती व्यवसाय आजकाल जरा जास्तच लोकप्रिय झाले आहे. ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा 

3. घरबसल्या एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता येईल का?

तुम्ही घरबसल्या अनेक घरगुती व्यवसाय करू शकता जसे कि Blogging, Youtube channel, ट्युशन क्लास घेणे, वेबसाईट बनवणे.  ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा 

3. गृह आधारित व्यवसाय करण्याचे फायदे काय आहेत?

गृह आधारित व्यवसाय करण्याचे अनेक फायदे आहे जसे कि – 
1. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता
2. लॉक डाऊन चा व्यवसायावर खुप मोठा फरक पडत नाही 
3. तुम्हाला भाड्याने दुकान घेण्याची गरज नाही 
4. घरातल्या लोकांची देखील कामात मदत होते
5. कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करता येतो
५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

4. तुमच्याकडे घर आधारित व्यवसाय का असावा?

तुमच्या कडे घर आधारित व्यवसाय असण्याचे खूप फायदे आहे जसे कि लॉक डाऊन चा व्यवसायावर खुप मोठा फरक पडत नाही, वेळेनुसार काम करता येत, कमी गुंतवणुकीत व्यवसाय करता येतो . ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा 

5. कोणता उद्योग गृह आधारित उद्योग आहे?

मसाला बनवणे, लोणचे पापड बनवणे, ब्लॉगिंग करणे, युट्युब चॅनेल सुरु करणे हे काही गृह आधारित उद्योग आहे.  ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

6. घरबसल्या केल्या जाणाऱ्या व्यवसायाला काय म्हणतात?

घरबसल्या केल्या जाणाऱ्या व्यवसायाला गृह उद्योग किंवा घरगुती व्यवसाय म्हणतात. ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

7. घरगुती व्यवसाय काय करावा? 

घरगुती कपडे विकण्याचा व्यवसाय, खानावळ, मसाला बनवणे, लोणचे पापड बनवणे, ब्लॉगिंग करणे, युट्युब चॅनेल असे घरगुती व्यवसाय तुम्ही करू शकता. ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

8. घरात कोणता व्यवसाय सुरू करता येईल?

घरगुती कपडे विकण्याचा व्यवसाय, खानावळ, ब्लॉगिंग करणे, युट्युब चॅनेल, ट्युशन क्लास असे अनेक व्यवसाय तुम्ही घरात सुरू करू शकता. ५५ नवीन घरगुती व्यवसाय जाणून घेण्यासाठी या पोस्ट वर क्लिक करा

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)