कोणताही Business सुरु करण्याआधी आपल्याला एक सर्वात महत्वाचं प्रश्न असतो तो म्हणजे Business तर करायचा आहे पण कोणता करायचा. Business सुरु करण्याआधी आपल्याला Business Ideas शोधाव्या लागतात.
या Post तुम्हाला काही अतिशय सोप्या Methods, सोप्या पद्धती सांगणार आहे ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतः हजारो Business Ideas शोधू शकाल.
पण त्या आधी एक सर्वात महत्वाची गोष्ट. तुम्ही ज्यावेळी Business Ideas शोधायला सुरुवात कराल त्या वेळेस जवळ एक Notebook आणि पेन ठेवा. आणि तुम्हला ज्या Business Ideas सापडतील त्या तुमच्या वहीत लिहून काढा. आणि हे खूप महत्वाचं आहे याला lightly घेऊ नका.
तुम्हाला वाटत असेल कि यानी काय विशेष होणार आहे. यांनी खूप काही होत.
कारण नुसताच विचार करत बसण्यापेक्षा जर तुम्ही कागदावर लिहून काढलं ते प्रचंड Effective असत. आपल्या डोक्यातला विचार आपल्या डोक्यातली कल्पना वास्तवात येणे गरजेचे आहे.
आपण रोज किती गोष्टींचा विचार करतो आणि त्यातील किती गोष्टींचा आपण serious घेतो. आपण काहीही फालतू विचार करत बसतो आणि नंतर परत एखादा नवीन विचार करू लागतो.
आपला मेंदू सर्वच गोष्टींचा महत्व देत नाही. त्यामुळे जर तुम्हला खरंच Business करायचा असेल आणि तुमच्या मेंदूला हे सांगायचं असेल कि हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मला खरंच एखादा Business सुरु करायचा आहे तर मग एखादी वही पेन जवळ ठेवा आणि तुम्हाला ज्या Business Idea सापडतील त्या कागदावर लिहून काढा.
तर सुरु करू आपली पहिली पद्धत.
1. Observe Your Surrounding
Observation हि निसर्गानी मानवाला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे आणि जर तुम्ही या देणगीचा पुरेपूर वापर केलात तर तुमच्या आयुष्यातील मोठमोठे Problems तुम्ही सहज सोडवू शकाल.
आता याच Observation नावाच्या देणगीचा वापर करून तुम्ही हजारो Business Ideas शोधू शकता. मग आता त्या कश्या शोधायचं, पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही ज्या शहरात , ज्या खेड्यात राहता त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे business लोक करत आहेत , अनेक वेगवेगळे दुकान आहेत.
दोन चार दिवस असाच बाहेर जरा फिरा आणि सोबत सांगितल्या प्रमाणे एक वही आणि पेन ठेवा.
आणि तुम्हाला जेवढे दुकान दिसतील त्यापैकी जेवढे जे जे व्यवसाय अथवा दुकान तुम्हाला बरे वाटतात बरे वाटतात म्हणजे तुम्हाला असं वाटत कि हा बुसीन्सस मी करू शकतो किंवा मी ह्या गोष्टी शिकून असा व्यवसाय सुरु करू शकतो ते व्यवसाय कागदावर लिहून काढा.
उदा – तुम्हला एखाद हॉटेल दिसलं , मग ते हॉटेल कसलं आहे जेवणच आहे का नाश्त्याचा आहे, का एखादा Special पदार्थ आहे. हे लिहून काढा. पुढं तुम्हाला कपड्याचा दुकान दिसलं – मग ते कोणते कपड्याच आहे, लहान मुलांच्या कपड्याचा आहे, मोठ्या माणसंच आहे, का फक्त T-shirt च आहे. पुढं तुम्हला एखाद Fabrication च दुकान दिसलं, मग ते नोटडाउन करा.
असे अनेक व्यवसाय, अनेक दुकान तुम्हाला आढळतील. फक्त या पद्धतीने तुम्हाला शेकडो चांगल्या Business Ideas मिळतील.
Observation चा वापर करून अजून एका पद्धतीने करायचा आहे. आता तुम्ही जिथे आहात, किंवा ज्याठिकाणी तुम्ही राहतात, मग तुमचं घर, Office अगदी कुठेही तुम्ही एक गोष्ट Observe करा तुमच्या आसपास किती वस्तू आहे.
प्रत्येक वस्तू एक Business आहे एक Business Idea आहे.
आपल्या आसपास चे जग हे वस्तुंनी भरलेले आहे. तुमच्या घरात तुम्हाला चार पाचशे वेगवेगळ्या Business सापडतील.
एक वस्तू म्हणजे एक Business Idea नाही तर एका वस्तू मागे जवळपास १५ – २० किंवा त्यापेक्षाही जास्त Business Ideas सापडतील .
आता मग कशा सापडतील. तर ती वस्तू कोणीतरी Manufacture करत, ती वस्तू Manufacture करण्यासाठी जे Raw Material लागत ते कोणीतरी Supply करत, ती वस्तू बनवण्यासाठी जे इतर छोटे मोठे पार्ट किंवा काही इतर Material लागत ते कोणीतरी Manufacture करत.
त्या वस्तू ची Marketing कोणीतरी करत, ती वस्तू Market मध्ये विकण्यासाठी साठी Distributors असतात, ती वस्तू रिटेल शॉप मध्ये कोणीतरी विकत असत.
अशा पद्धतीने एका वस्तू मागे, एका व्यवसायामागे अनेक Supporting Business Ideas किंवा त्याच्याशी Related Business Ideas तुम्हाला सापडतील. यासाठी तुम्हला जरा खोलवर जाऊन निरीक्षणात करावे लागेल, Research करावा लागेल कि हा Business नेमका कसा चालतो. वस्तूंसोबतच अनेक Services Business पण चालतात. जसे कि Shipping Service, Transport Service, Distributor Service, Marketing Service.
Service Sector मध्ये खूप Opportunities आहे आणि Service Sector मधले Business तुम्ही अतिशय कमी खर्चात सुरु करू शकता.
तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता तिथेही तुम्हला अनेक Business Ideas सापडतील.
तुम्ही भलेही तिथे जॉब करता पण तुम्ही जिथं जॉब करता तो एक business आहे. त्यामुळे तिथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तिथे अनेक प्रकारचे Product, Services असतात, तो Business अनेक प्रकारच्या Services घेत असतो अनके Product वापरत असतो तिथेही तुम्हाला अनेक Ideas मिळतील.
अशा प्रकारे Observation करून तुम्ही अनेक Business Ideas शोधू शकता. Observation करण्याची सवय लावा कारण नुसता Business मधेच नाही तरी आयुष्यातही Observation चा खूप उपयोग होईल.
2. Become A Problem Solver
Problems हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे . तुम्ही गरीब असलात काय आणि श्रीमंत असलात काय Problems प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त ते वेगवेगळे असतात.
आता या Problem कड बघण्याचे दोन मार्ग आहेत एक तर Problem आला म्हणून रडत बसा आणि दुसरा मार्ग म्हणजे त्या problems मधली Opportunity शोधा.प्रत्येक Problem मध्ये काहींना काही Opportunity असते.फक्त ती तुम्ह्लाला शोधता आली पाहिजे.
उदा – अनेक वेळेस प्रवास करताना अप्प्ल्याजवळ जड Bags असतात. अनेक वेळेस लोकांच्या वजना पेक्षा त्यांच्या बॅग्स जड असतात. आणि सर्वसामान्य लोकांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी, गरोदर महिलांसाठी हा एक मोठा Problem असायचा.
कारण प्रवास करायचा, कुठं जायचं म्हणजे या जड Bags उचलाव्या लागणार. तुम्ही शरीराने कितीही धडधाकट असले तरी इथे तुमची Energy विनाकारण वाया जात असायची. आता हा Problem आहे हे सर्वांना माहित होत.
पण लोक म्हणायचे कि जग असाच चालत तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर या Bags उचलाव्याच लागतील. पण या Problem च Solution शोधण्याचा प्रयत्न या लोकांनी केला नाही.
पण एक व्यक्ती होता ज्याने हा Problem सोडवण्याचा प्रयत्न केला त्याने दोन छोटी छोटी चाके या बॅग्स च्या खाली बसवली आणि करोडोचा Business उभा केला. इथं त्याने एक मोठा प्रॉब्लेम Solve केला आणि म्हणूनच एवढा मोठा Business उभा राहिला. अनेक मोठमोठे Brands आणि Businesses हे याच पद्धतीने मोठे झाले आहेत.
आता तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात काही असे Problems आहे का जे इतरांनाही आहे आणि ते Problems तुम्हाला सोडवता येतील का ? किंवा तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांना कोणते Problems आहे ते तुम्हाला सोडवता येतील का ? आणि त्या बदल्यात ते लोक थोडा खर्च करायला तयार आहेत का ?
तुम्ही काही असे Product किंवा काही अशा Services बनवू शकता का कि ज्यांच्या मुळे ते Problems सुटतील. सर्वात पहिले तुम्हला जे जे Problems सापडतील ते एका वहीत लिहून काढा. आणि मग जरा विचार करा कि यातील कोणते Problems तुम्ही सोडवू शकता.
तुम्हाला जर असे लोकांचे Problems Solve करता आले तर तुम्ही करोडोंचा Business उभा करू शकता. आणि Problem काही फार मोठे असले पाहिजे असेही काही नाही रोजच्या जीवनातले काही छोटे मोठे Problems जरी तुम्ही Solve केले तरी तुम्ही एक मोठा Business उभा करू शकता. फक्त तो Problem जास्तीत जास्त लोकांना असला पाहिजे, आणि तो प्रॉब्लेम त्या लोकांकडून सहज Solve न होणार असला पाहिजे. आणि जर तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवला योग्य किमतीत तर नक्कीच तुम्हाला खूप सारे Customer मिळतील आणि तुमचा व्यवसाय मोठा होईल.
3. Bad Product / Bad Service Solution
अनेक ठिकाणी चांगले Product किंवा चांगल्या सर्विसेस मिळत नाही. तुम्हालाही असा अनुभव अनेक वेळेस आला असेल त्यावेळेस असा विचार करा कि इथे मला काही व्यवसाय करायची संधी आहे का ?
उदा – तुम्ही तुमच्या Family सोबत एका Hotel मध्ये गेलात तुम्ही खूप आनंदात Enjoy करण्यासाठी त्या हॉटेल मध्ये गेलात पण तिथे गेल्यावर तुम्हाला चांगली Service मिळाली नाही, बसायला जागाच नव्हती किंवा तिथे अस्वच्छता होती.
तुम्ही वेटर ला एक ठराविक पदार्थ ची Order दिली त्या वेटर ने अर्धा तास लावला आणि तो दुसराच पदार्थ घेऊन आला.
याला म्हणतात Bad Service.अशा प्रकारे Bad Service, Bad Product मध्ये तुम्हाला खूप साऱ्या Opportunities दिसतील. तुम्ही जर त्या Bad Service एखादी पर्यायी चांगली Service निर्माण करू शकलात तर तुम्ही एक मोठा व्यवसाय सुरु करू शकता. आता मग नेमकं काय करायचं.
आता इथे तुम्हाला Market मधले जे Bad Product आणि Bad Services आहेत त्या शोधून काढायच्या आहे.
अशा Services आणि अशे Product जे Market मध्ये चालत तर आहेच, त्याची Demand हि आहे. पण त्यांची Quality चांगली नाही, किंवा त्यात अजून चांगली Improvement केली जाऊ शकते. अनेक तुम्हालाही काही अनुभव आले असतील. हे सर्व एका वहीत लिहून काढा.
या Products ची आणि Services एक लिस्ट तयार करा.
आणि आता बघा कि यातील कोणते Product आणि कोणत्या Services तुम्ही अजून Improve करू शकता. किंवा यांना काही नवीन Alternative Product किंवा Alternative Service निर्माण करू शकता का ?.
अनेक वेळेस प्रॉडक्ट चांगला असतो पण Customer Service चांगली नसते तिथे Product तोच फक्त तुम्ही चांगली Customer Service देऊ शकता.
Amazon च्या यशाचं एक सर्वात मोठं कारण हेच आहे त्यांची कस्टमर Service एकदम चांगली आहे, त्यांची Shipping एकदम सुपर फास्ट आहे बाकी ऍमेझॉन वर विकले जाणारे Product काय विशेष नाही पण त्यांची Service उत्कृष्ट आहे त्यामुळे लोकांचा Amazon वर विश्वास आहे आणि म्हणूनच Amazon ने एवढी प्रगती केली आहे.
इथं सर्वात महत्वाचं जर काही असेल तर तुम्हाला प्रथम त्या Bad Service चा, त्या बॅड Product चा अभ्यास करावा लागेल, त्याच Market किती मोठं आहे, त्याच Future काय आहे ? आणि मगच तुम्ही एक चांगली Service किंवा चांगला Product देऊ शकाल आणि एक चांगला नवीन व्यवसाय सुरु करू शकाल
4. अस असत तर बर झालं असत
अनेक वेळेचं आपण विचार करतो कि हि गोष्ट अशी असती तर किती बर झालं असत.
- असा एखादा प्रॉडक्ट असता तर किती बर झालं असत.
- अशी एखादी Service असती तर किती बर झालं असत.
- असं एखाद Machine असत तर किती बर झालं असत.
- असं एखाद Software असत तर किती बर झालं असत.
- अशी एखादी Website असती तर किती बर झालं असत.
आता या सोबतच तुम्हला अजून असा विचार करायचा आहे तो म्हणजे मला असं काही बनवता येईल का ? मी असं एखाद Product किंवा अशी एखादी Service कशी बनवू. तुम्ही विचार करायला लागले कि तुम्हाला नवनवीन Ideas सुचायला लागतील.
उदा –
- सगळे Videos एका जागी मिळाले तर किती चांगलं होईल असा एकाने विचार केला आणि YouTube चा शोध लागला.
- दूरवरून एकमेकांशी बोलता आले तर किती बार होईल Telephone चा शोध लागला.
- प्रवास जलद करता आला तर किती बार होईल वाहनांचा शोध लागला.
- Online खरेदी, विक्री करता आली तर किती बर होईल आणि E-commerce Websites चा शोध लागला.
- हवेत उडता आले तर किती बर होईल विमानाचा शोध लागला.
- बेरीज, वजाबाकी, गणित जलद करता आले तर किती बर होईल Calculator चा शोध लागला.
अशा पद्धतीने तुम्ही नवीन Product किंवा Service बनवू शकता. या साठी तुम्हला थोडासा विचार करावा लागेल.
आता हि Method आणि आधी सांगितलेली Problem Solving Method या दोन्ही Methods एकत्र करून तुम्ही एखादा चांगला Product बनवू शकता.
उदा – तुम्हाला एखादा Problem आला तर तो Problem Solve करण्यासाठी असा एखादा Product किंवा Service असती तर बर झालं असत असे विचार तुमच्या डोक्यात येत असतील तर तिथे तुम्हाला अनेक चांगल्या Business Ideas सापडतील.
या पद्धतीने Business Idea शोधण्यासाठी, Product बनवण्यासाठी वेळ लागतो. पण या पद्धतीने तुम्ही एखादा नवीन Product एखाद नवीन invention करू शकता.
5. Education Related Business Ideas
तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे तुम्ही त्या क्षेत्रातही Business करू शकता
उदा – जर तुम्ही Commerce Graduate असत तर Accounting शी Related Business करू शकता. तुम्ही जर Hotel Management केली असेल तर त्याचाशी Related बुसीन्सस करू शकता. तुमच एखाद Hotel सुरु करू शकता. तुम्ही जर Engineer असाल तर त्याचाशी रेलटेड Business करू शकता.
आता शिक्षणाचं आणि Business काही संबंध नसतो. पण तरीही तुमच्या डोक्यात जर तशा काही Ideas येत असतील तर तुम्ही नक्कीच त्या दृष्टीने विचार करू शकता.
तुम्ही तुमच्या शिक्षणाशी related व्यवसाय हि करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील लोकांसोबत Contact मध्ये राहावं लागेल , तसेच तुम्ही Online Search करून शोधू शकता कि तुमच्या शिक्षणाशी मिळतेजुळते काही Business आहेत का. तुम्हाला बाहेर फिरावं लागेल, लोकांना भेटावं लागेल.
तुमच्या सारखं शिक्षण घेतलेलं लोक काय करत आहे ते बघावं लागेल. तुम्हाला अश्या पद्धतीने अनेक Business Ideas सापडतील. पण आता इथे एखादी Business Idea तुमच्या शिक्षणाशी Related आहे म्हणून मग तुम्ही तोच Business केला पाहिजे असं काहीच नाही, किंवा त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता असं काहीच नसत.
तुमचं शिक्षण आणि Business या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याचा Business तुम्हाला करता येईल का याचा नीट विचार करा. तुम्ही जे शिक्षण घेतलं त्यातलं तुम्हाला खरंच काही येत का? नुसतीच Degree घेतली म्हणजे कोणी Engineer होत नाही. त्यातलं Knowledge असणंहि गरजेचं आहे.
पण तरीही तुम्ही जर एका ठराविक क्षेत्रात शिक्षण घेतलेलं असेल तर त्याचा थोडाफार फायदा तुम्हाला नक्कीच होईल. म्हणूनच तुम्ही तुमच्या Education शी Related Business पण करू शकता.
6. Existing Product or Service Improvisation
तुम्ही अनेक वेळेस वेळेस ऐकले असेल काहीतरी Unique Business Idea शोधा. काहीतरी नवीन करा. लोक जे करता तेच तेच करू नका पण आता Unique Idea म्हणजे काय.
तुम्ही काहीही करा कोणी ना कोणी तो Business आधीपासूनच करत असत. कदाचितच , अपवादात्मक एखादा दुसरा Business असा असतो जो अगदीच Unique असतो किंवा तो Business आधी कोणी केलेला नसतो.परंतु सर्व सामान्यपणे तुम्ही कोणताही Business करा तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने इतर कोणी करत असत.
असे अनेक मोठमोठे Business आहेत ज्यांत मार्केट मध्ये Monopoly आहे किंवा त्यांना कोणी स्पर्धकांच नाही, ते एकदम unique आहे असं आपल्याला वाटत पण प्रत्यक्षात तस नाही.
उदा – Google हे काय पाहिलं Search Engine नाही. Google च्या आधीही अनेक Search Engine Market मध्ये होते आणि अजूनही Google व्यतिरिक्त अनेक शेअरच Engine Market मध्ये आहे पण Google ने त्यांच्यापेक्षा चांगली Service चांगले Product दिली म्हणूनच Google टॉप वर आहे.
आज जवळपास सत्तर टक्के मार्केट Google च्या ताब्यात आहे. Facebook हे काय पहिले Social Media Site नाही त्याआधीपण अनेक Social Media Site होत्या पण Facebook ने जी Quality Service दिली त्यामुळे Facebook Top वर आहे.
त्यामुळे जर काही मोठा Business करायचा असेल तर काही नवीन शोध लावला पाहिजे, किंवा अगदी नवीनच कल्पना पाहिजे असं काही नाही. आता सध्या एखादा चांगला Product , एखादी चांगली Service जर कोणी मार्केट मध्ये देत असेल तर तुम्ही त्यातच काही कल्पना, तुमचं Imagination वापरून, त्यात अजून Improvisation सुधारणा करून, त्याचे Benefits अजून वाढवून, त्याची Quality अजून Improve करून , एका नवीन पद्धतीने तुम्ही
तोच प्रॉडक्ट किंवा तीच Service तुम्ही मार्केट मध्ये देऊ शकता आणि एक चांगले Business उभा करू शकता.
Conclusion
स्वतःच्या Business Idea स्वतः शोधा, दुसऱ्याच्या Business Idea वर Business सुरु करण्यापेक्षा स्वतः Idea शोधा आणि त्यावर काम करा. अनेक लोक इतरांना Business आयडिया विचारतात आणि त्यांनी एखादी आयडिया दिली कि लगेच तो Business चालू करतात.
कोणत्याही Idea ची नीट शहानिशाह करण गरजेचं आहे त्या Business Idea ची Positive Side तसेच Negative Side दोनीही बघून मग निर्णय घ्या. तुमच्या कडे Resources किती आहे, तुम्हाला काय जमेल , तुम्हाला काय चांगलं येत, तुमच्या Area त काय चालेल हे शोधा मगच Business सुरु करा.